Vaibhav Chavan Biography in Marathi
वैभव चव्हाण हा एक प्रतिभावंत अभिनेता आहे व त्याने मराठी एंटरटेनमेंट इंडस्ट्री मध्ये चांगलच नाव कमावलेलं आहे. आपल्याला अभिनेताच व्हायचंय हे त्याने लहानपणीच ठरवलं होत आणि याच जिद्दीमुळे त्याने शालेय तसेच कॉलेजमध्ये असतांना नाटकांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. शालेय आणि कॉलेज मधील होणाऱ्या नाटकांमुळे वैभवचे अभिनय हे नावारूपाला आले आणि त्यासाठी त्याला अनेक अशे पुरस्कारे देखील भेटली आहेत. त्याचा हाच प्रवास वैभवला “मन झालं बाजींद” या झी मराठी वर प्रदर्शित होणाऱ्या मालिकेपर्यंत घेऊन आला आणि महाराष्ट्रातल्या रसिकांना रायाच्या रूपात स्वतःची ओळख करून दिली. वैभवचा हाच प्रवास Vaibhav Chavan Biography in Marathi या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत.
सुरवातीचे आयुष्य:-
वैभवचा जन्म 10 मार्च 1993 रोजी बारामती, पुणे, महाराष्ट्र येथे झाला. अभिनय क्षेत्राकडे आपल्याला जायचं आहे हे त्याने मनाशी ठरवलंच होतच. शालेय आणि कॉलेज मधील नाटकांमधल्या सहभागाने त्याचा अभिनयाचा पाया हा आणखी भक्कम झाला. अभिनयाकडे तर त्याची वाटचाल सुरूच होतीच त्यासोबतच आपल्या घरच्या शेतीमध्येही त्याचा हातभार असायचा. त्याने आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्यासोबतच स्वतःला स्तिर ठेवता येईल या करिता नौकरी देखील केली.
वैभवला मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश हा इतक्या सहजासहजी आणि त्वरितरित्या मिळालेला नाही. त्याने त्याची सुरुवात पडद्यामागच्या साऊंड तसेच पोशाख विभागात कामे करून केली. स्पॉटबॉय म्हणून, तसेच पोशाख विभागात असताना कलाकारांचे कपडे इस्त्री करणे यांसारखी कामेही त्याने केलेली आहेत. हि सगळी कामे करत असतानाच चित्रपट दिग्दर्शन तसेच इतर संबंधित तांत्रिक गोष्टीं ह्या कश्या काम करतात हे तो जवळून अनुभवत होता. पडद्यामागच्या घडणाऱ्या घडामोडी पाहत पाहत त्याच्या करिअरला ह्या प्रवासादरम्यानच उजाळी मिळाली. या काळात त्याचे अनेकांशी चांगले हितसंबंध जोडले गेले व पुढे याचा त्याला खूप फायदा देखील झाला.
करिअर:-
या प्रवासादरम्यानच वैभवला त्याची पहिली मराठी मालिका मिळाली जिचं नाव होतं “मन झालं बाजींद” जी झी मराठी या चॅनेल वर प्रदर्शित होणार होती. मन झालं बाजिंद ह्या मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केले असून तेजपाल वाघ यांच्या वाघोबा प्रोडक्शन द्वारे निर्मिती करण्यात आली आहे. वैभव चव्हाण आणि श्वेता खरात हे दोघे या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसून आले.
२३ ऑगस्ट २०२१ रोजी हि मालिका प्रदर्शित झाली. श्वेताने कृष्णाची भुमिका केली आहे आणि वैभवने रायाची भूमिका केली आहे. कृष्णा हि उच्च शिक्षित मुलगी कमी शिक्षित असलेल्या रायाशी लग्न करते. सुरवातीला एकमेकांना नापसंत करणारे हे जोडपं पुढे जाऊन कसे लग्न करतात ह्या बद्दलचा प्रेमाचा ड्रामा व त्या दोघांचा संपूर्ण प्रवास या मालिकेत आपल्याला पाहायला मिळतो.
रायाच्या भूमिकेत वैभव दिसला आणि त्याने त्याच्या अभिनयाने लोकांची मने जिंकून तो महाराष्ट्रातील घरघरात पोचला. रायाचे पात्र हे लोकांच्या मनाशी जुळवून असे घेणारे ठरले. या पात्राने वैभवला प्रसिद्धी तर खूप मोठ्या प्रमाणात मिळवुन दिली त्यासोबतच मराठी चित्रपॅट तसेच मराठी इंडस्ट्री मध्ये असलेल्या संधीचे दार देखील उघडून दिले.
अभिनयाव्यतिरिक्त वैभवची बॉडी बिल्डिंग मध्ये रुची आहे आणि हे आपल्याला त्याची शरीरसृष्टी पाहून अंदाज येतोच आणि त्याने हे शरीर बनविण्याकरिता वर्ष्यानुवर्षे मेहनत घेतली आहे. वैभवने याच मेहनतीच्या बळावर महाराष्ट्र शरीर सौष्ठव स्पर्धेत सुवर्ण पदक ही मिळवले आहे. आपल्या फिटनेस बद्दल त्याने अनेक वेळा आपल्या चाहत्यांना सांगितले आहे आणि त्या नुसार अनेकांनी आपल्या शरीरावर काम करण्यास सुरुवात देखील केली आहे.
यशस्वी अभिनय करिअर आणि बॉडी बिल्डिंग या दोघांचे संतुलन ठेवणं हे खूप कठीण असे काम आहे परंतु वैभव या दोन्ही विषयांना सहजरित्या हाताळतो. त्याची व्यायाम करण्याची दिनचर्या तसेच शिस्तबद्ध जीवनशैली त्याला त्याचे शरीर सुदृढ ठेवण्यात मदत करते. त्याचा असा ठाम विश्वास आहे कि चांगले शरीर हे मेंदूला चालना तर देतेच त्यासोबतच अभिनयावर वर लक्ष देखील केंद्रित करता येते. वैभवची हीच मेहनत व स्वतःला झोकून देण्याची शैली अनेकांना प्रभावित करते.
वैभव चव्हाणचा मराठी इंडस्ट्रीमधला हा प्रवास हा वाखण्याजोगा व अनेकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. एका छोटा शहरातला मुलगा आपल्या मेहनतीच्या जोरावर आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो व यशाचे शिखर हे गाठू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैभव चव्हाण. कामाचे नियोजन, मेहनत करण्याची तयारी हि “वैभव”ची वैशिष्ठे आहेत.
वैभव चव्हाणच्या असाध्य गोष्टीला साध्य करण्याच्या जिद्दीने त्याने मराठी इंडस्ट्री मध्ये स्वतःचे स्थान हे पक्के केले आहे आणि त्याला भविष्यात खूप सारे प्रोजेक्ट्स भेटतील अशी त्याच्या फॅन्सची अपेक्षा होती आणि अश्यातच वैभव चव्हाणला बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये स्पर्धक म्हणून आमंत्रण आलं व त्याने ते स्वीकारले.
Big Boss Season 5 मधील प्रवास:-
वैभवची बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये एंट्री तर धमाकेदार झालीच आणि एकाच सफ्ताहामध्ये त्याची मैत्री अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, इरीना रुडकोवा, घनश्याम दरोडे यांच्या सोबत झाली. ह्या शोने टी. आर. पी. चे उच्चांक गाठले होते. पहिल्या सफ्ताहचा प्रवास बघून रितेश देशमुख यांनी भाऊचा धक्क्याच्या भागात वैभवची कानउघाडणी करून त्याला या खेळात स्वतंत्र खेळण्यास सांगितले आणि आपल्या सगळ्यांना तर माहीतच असेल की या शो दरम्यान दोन ग्रुप तयार झाले होते. अरबाज पटेल -वैभव चव्हाणचा A ग्रुप आणि अभिजीत सावंत-अंकिता प्रभू वालावलकर यांचा B ग्रुप. कॅप्टन पदाचा टास्क असो किंवा इतर कोणतेही टास्क असो दोन्हीही ग्रुप एकमेकांसमोर दुश्मनांसारखे वावरताना आपल्याला दिसतात नेहमी दिसून आले.
टीम A ची मैत्री आणि हा ग्रुप बराच काळ आपला वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरला आणि बिग बॉसने सांगीतल्याप्रमाणे हा सीजन ट्विस्ट्स ने भरलेला असणार व हे आपल्याला पाहायला हि मिळाले आणि एका पाठोपाठ एक धक्के बिग बॉस सर्व स्पर्धकांना व प्रेक्षकांना दिले. डेंजर झोन हि एक नवीन संकल्पना बिग बॉस ने चालू केली आणि यामुळेच आपण योगिता चव्हाण आणि निखिल दामले यांना बिग बॉसच्या घराबाहेर जाताना पाहिलं त्यामुळे वैभव आणि इतर खेळाडूंची कसोटीच आपल्याला पाहायला मिळाली. जेव्हा नॉमिनेशन मध्ये वैभवचे नाव आले तसेच सोशल मीडिया वर उमटणाऱ्या प्रतिक्रियांवरून वैभव हा चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे खेळ खेळत नव्हता. कदाचित निकी आणि अरबाज यांच्यासोबतची त्याची मैत्री त्याला कारणीभूत ठरली असावी आणि याच कारणाने वैभवला कमी मते पडल्याकारणाने बिग बॉस च्या घराबाहेर पडावं लागलं. घराबाहेर आल्यावरही अनेक मुलाखतीत या कारणांचा त्याने आपली सहमती दर्शवली व केलेल्या चुकांची कबुली दिली.
इंस्टाग्राम वरचे वायरल होणारे रील्स पाहून लोकांनी या शोबद्दल जास्तच उत्सुकता दाखवली व हा शो न चुकता लोक पाहु लागले. रोज काही तरी नवीन घडणार या भावनेने प्रेक्षकांनी हा शो अगदी डोक्यावर घेतला होता. हा सीजन इतका प्रचलित झाला कि सोशल मीडियावर मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारही या शो आणि स्पर्धकांबद्दल आपली प्रतिक्रिया देत असताना आढळून आल्या. सुरज चव्हाण, A टिम, B टीम, निक्की तांबोळी अश्या बऱ्याच कारणांनी हा सीजन गाजला. रितेश देशमुख यांचं सडेतोड आणि मुद्देसूद बोलणं तसेच स्पर्धकांची वेळोवेळी कानउघाडणी करणे लोकांना पसंत आलं. बिग बॉस हा मानवी भावनांचा खेळ तर आहेच त्या सोबत स्थैर्य आणि जिद्द यांची देखील कसोटी लागते हे आपल्याला ह्या सीजन मध्ये पाहता आलं.
मालिकांची यादी:-
मन झालं बाजींद | रायबा(राया) भाऊसाहेब विधाते |
बिग बॉस मराठी सीजन 5 | स्पर्धक |
वैयक्तिक माहिती :-
खरे नाव | वैभव चव्हाण |
टोपण नाव | वैभव, वी |
प्रोफेशन | अभिनेता |
जन्म तारीख | 10 मार्च 1993 |
सध्याचे वय | 31 वर्षे |
कुटुंबाबद्दल माहिती | आई- अजून अपडेट व्हायचे आहे वडील- अजून अपडेट व्हायचे आहे |
जन्मठिकाण | बारामती, पुणे, महाराष्ट्र |
सध्याचे शहर | मुंबई, महाराष्ट्र |
वैवाहिक स्तिथी | अविवाहित |
अफेर/गर्लफ्रेंड | माहिती अस्तित्वात नाही |
बायको | अविवाहित |
मुले/मुली | अविवाहित |
धर्म | हिंदू |
शैक्षणिक माहिती | B. Sc. Agricultre/MBA |
शाळा | विद्या प्रतिष्ठानचे नवीन बाल विकास मंदिर(VPBVM), बारामती, पुणे, महाराष्ट्र. |
कॉलेज | 1.कृषी आणि संलग्न विज्ञान महाविद्यालय, बारामती, पुणे, महाराष्ट्र 2. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, पुणे, महाराष्ट्र |
छंद | अभिनय, जिमिंग |
नागरिकत्व | भारतीय |
सोशल मीडिया बद्दल माहिती :-
इंस्टाग्राम | https://www.instagram.com/vaibhavchavanofficial/?hl=en |
यूट्यूब | https://www.youtube.com/@VeeVlogs_VaibhavChavan/videos |
फेसबुक | https://www.facebook.com/vaibhav.chavan.391/ |
इंस्टाग्राम वरच्या फौलोअर्स ची संख्या | 1.19 लाख |
मुसिकल व इतर व्हिडीओ:-
वैभवने स्वतःचे यूट्यूब चॅनेल देखील चालू केले आहे आणि यामध्ये तो त्याच्या दैनंदिन घडामोडी या कॅमेऱ्यात कैद करून त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचवतो. कडूचा बर्थडे हा त्याचा पहिला व्लॉग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
निष्कर्ष:-
परिस्तिथी कशीही असो आपल्यात जिद्दपणा आणि चिकाटी असेल तर माणूस सामान्य कुटुंबातून येऊन सुद्धा मराठी इंडस्ट्रीमध्ये आपला नावं हे बनवू शकतो हे वैभव चव्हाणकडे बघून आपल्याला कळते. शेतकरी ते स्पॉटबॉय – स्पॉटबॉय ते मराठी टेलिव्हिसन सुपर स्टार असा हा वैभव चा प्रवास खरच सर्वांना थक्क करणारा ठरतो. अभिनयासोबतच शरीराचे संतुलन राखणे हे वैभव कडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आणि हाच त्याचा जीवनप्रवास Vaibhav Chavan Biography in Marathi ह्या ब्लॉग द्वारे आपण पहिला. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असल्यास आम्हाला खाली दिलेल्या इमेल आयडी वर रिप्लाय करून तुमचा फीडबॅक देऊ शकता.
E-Mail Id – Marathitube24@gmail.com