Abhijeet Sawant Biography In Marathi |अभिजीत सावंतची बायोग्राफी

Abhijeet Sawant Biography In Marathi

अभिजीत सावंत हे नाव ऐकल्यावर आपल्या सर्वांना एकच आठवतं ते म्हणजे इंडियन आयडॉल सीजन 1 हा शो जो सोनी टीव्ही वर लागायचा आणि अभिजीत या शोचा अंतिम विजेता देखील ठरला होता. अभिजीतच्या आयुष्याला खरे वळण हे ह्याच शो द्वारेच मिळाले. गायनाची आवड ते इंडियन आयडॉल विजेता होण्यापर्यंतचा अभिजीतचा हा जीवनप्रवास Abhijeet Sawant Biography In Marathi या ब्लॉगद्वारे आपण आज पाहणार आहोत.

Abhijeet Sawant Biography In Marathi |अभिजीत सावंतची बायोग्राफी

सुरवातीचे आयुष्य:-

अभिजीत सावंतचा जन्म ७ ऑक्टोबर १९८१ साली मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. अभिजीत लहानाचा मोठा हा मुंबईतच झाला. अभिजीत हा त्याच्या आजीच्या घरी एकत्रित कुटुंबामध्येच वाढला जेथे अभिजीतचे आई वडील तसेच इतर ६-८ लोकं एकाच खोलीचे राहत असत. अभिजीत चे वडील हे शिक्षक होते व आई हि गृहिणी आहे. अभिजीत शालेय शिक्षणात साधारण असा विद्यार्थीं होता. त्यामुळेच त्याला परीक्षा असली खूप भीती वाटायची.

एकदा त्याच्या शाळेत गायनाच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं तेव्हा अभिजीत हा इय्यता ६ वी मध्ये होता त्याने हि या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे ठरवले आणि त्याच्या गायनाचे कौतुक पूर्ण शाळेत झाले आणि शिक्षकांनी देखील पाठीवर शाबाशकीची थाप दिली. अभिजीतला हा प्रसंग अगदी मोहून टाकणारा वाटला आणि आपण हि क्षेत्रात जावं अशी आशा तो बाळगू लागला.

अभिजीत ने जेव्हा आपले १० वीचे शिक्षण पुरे केले तेव्हा त्याच्या काकांनी एका कॅसेटच्या शॉपमध्ये त्याला नोकरीला लावले, जिथे त्याला दरमहा ६०० रुपये भेटत असत.त्याचे काका ऑर्केष्ट्रा मध्ये गायन करत असत आणि त्यांनी अनेक असे शो त्या काळात केले होते आणि अभिजीतही त्यांना या शोमध्ये गायनाची साथ देत होता.

हळूहळू त्याची गायन क्षेत्रामध्ये रुची वाढू लागली आणि त्यानें ठरवले कि आपल्याला हि गायकच बनायचे आहे. सुरवातीला त्याच्या आई वडिलांना हा त्याचा निर्णय अमान्य होता. परंतु अभिजित आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि तो त्याच्या काकांच्या घरी राहू लागला. पुढे त्याने भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण त्याचे गुरु भावदीप जयपुरवाले यांच्याकडे घेतले.

करिअर

गायन क्षेत्रात उतरल्यानंतर अभिजीतला कार्यक्रम तर मिळत होते परंतु अभिजीतच्या करिअरला खरा उजाळा मिळाला तो इंडियन आयडॉल सीजन 1 या शोमुळेच. पॉप आयडॉल या ब्रिटिश कार्यक्रमाला प्रेरित होऊनच या शो ची निर्मिती केली गेली होती व सोनी टीव्ही वर हा शो 2004 साली प्रदर्शित झाला. हा शो भारतात प्रदर्शित होताच चाहत्यांना तो एवढा आवडू लागला कि टी. आर. पी. चे सर्व उच्चांक मोडून टाकले होते.

गायनाची आवड असणारे लोक तर हा शो पाहतच होते त्यासोबत इतर लोकं देखील पाहू लागले. अनु मलिक, फराह खान, सोनू मलिक हे या शोचे परीक्षक होते. भारताच्या प्रत्येक राज्यातून सर्वोत्कृष्ट असे १२ गायक निवडण्याचे आव्हाहन या तिन्हीही परीक्षकांवर होते. मुंबई शहरामध्ये जेव्हा ऑडिशन होते तेव्हा अभिजीत सावंतने त्याच्या सुरेल आवाजाने परीक्षकांचं मन जिंकलं व त्यांनी अंतिम १२ मध्ये अभिजीत हि असेल असे घोषित केलं.

या स्पर्धेत अभिजीत हा उत्त्तम असा प्रदर्शन देत होता आणि यामुळेच मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरात त्याचा चांगलाच असा चाहता वर्ग वाढला होता आणि चाहत्यांचं हेच प्रेम अभिजीतला अंतिम ४ स्पर्धकांपर्यंत घेऊन आलं. जेथे त्याच्या सोबत अमित साना, राहुल वैद्य, प्राजक्ता शुक्रे असे सुमधुर गायक होते. अंतिम फेरीत राहुल वैद्य आणि प्राजक्ता शुक्रे यांना कमी मते मिळाल्यामुळे त्यांना अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

शेवटी अभिजीतची अंतिम लढत हि अमित सोबत झाली आणि हि लढत एकदम चुरशीची झाली होती. दोघांना हि चाहत्यांनी डोक्यावर घेतल परंतु शेवटी मताधिक्य अभिजीतला जास्त असल्याने मराठमोळा अभिजीत सावंत हा पहिला इंडियन आयडॉल बनण्याचा मानकरी ठरला. या स्पर्धेचा विजेता म्हणून अभिजीतला ५० लाख रुपये, सोनी मुसिक सोबत एक अल्बम आणि होंडा सिटी कार बक्षिस म्हणून मिळाली.

वैयत्तिक माहिती:-

नाव अभिजीत सावंत
टोपण नाव अभिजीत
जन्म दिनांक 7 ऑक्टोबर 1981, बुधवार
वय42 वर्षे
जन्मठिकाणमुंबई, महाराष्ट्र
प्रोफेशन गायक, गीतकार, संगीतकार, होस्ट, अभिनेता
ओळखला जातोइंडियन आयडॉल सीजन 1 चा पहिला विजेता
उंची(अंदाजे)5 फूट 8 इंच
केसांचा रंगकाळा
डोळ्यांचं रंगकाळा
शिक्षण12 वी
शाळा व कॉलेज1)राजा शिवाजी विद्यालय, दादर, मुंबई, महाराष्ट्र
2)चेतना एच. एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई, महाराष्ट्र
आई-वडील यांची नांवे1)श्रीधर पांडुरंग सावंत (शिक्षक)
2)मनीषा सावंत
बहिणीचं नावसलोनी राऊत
वैवाहिक स्तिथी विवाहित
लग्नाची तारीख4 डिसेंबर 2007
पत्नीचे नावशिल्पा (एडवणकर) सावंत
मुलांची नावेमुलगी-समीरा सावंत आणि आहाना सावंत
सध्याचे राहत असलेलं शहर मुंबई, महाराष्ट्र
धर्मबौद्ध
राष्ट्रीयत्व भारतीय 
आवडते गायकमोह्हम्मद रफी, सोनू निगम, किशोर कुमार, उदित नारायण
आवडता अभिनेताशाहरुख खान
आवडती अभिनेत्रीराणी मुखर्जी
आवडते कार्टूनटॉम अँड जेरी, पॉपाय दि सेलर मॅन
आवडता क्रिकेटरसचिन तेंडुलकर
आवडते खाद्यपदार्थ डाळ-भात

वाद:-

ड्रंक अँड हिट प्रकरणात आले होते नाव

सुरेल अभिजीत सावंतच नाव एकदा ड्रंक अँड हिट प्रकरणात आलं होतं. एका रात्री अभिजीत, इंडियन आयडॉल मधील सहस्पर्धक प्राजक्ता शुक्रे तसेच इतर काही जण पार्टी करून मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होते. अभिजीत हा त्याची ऑडी कार चालवत होता तर प्राजक्ता हि तिची होंडा सिटी कार चालवत होती. घरी परतत असतांना त्यांना रस्ता खाली भेटला व हे पाहून त्यांनी कार रेसिंग करण्याचे ठरवले. दोघांनी हि गाडी भरदाव वेगाने चालवायला सुरुवात केली.

त्या दोघांचाही गाड्यांची गती हि अंदाजे ताशी 110 किमो.पेक्षा जास्त होती आणि यातच प्राजक्ताचं तिच्या कारवरचं नियंत्रण सुटल व तिची कार एका दुचाकी स्वाराला जाऊन ठोकली. यात दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेली व्यक्तीला दुखापत झाली. हे पाहून आजूबाजूचे लोक जमा झाले हे सर्व पाहून अभिजीत तिच्या मदतीला धावत जात असतांनाच संतप्त जमावाने अभिजीत ला मारण्यास सुरुवात केली. काही वेळातच तेथे पोलीस आले व त्यांनी प्राजक्ता आणि अभिजीतला बेजबाबदारपणे गाडी चालवण्याच्या गुन्ह्या अंतर्गत अटक केले. नंतर त्या दोघांचीही जामिनावर सुटका करण्यात आली.

सोशल मीडिया बद्दल माहिती :-

इंस्टाग्रामhttps://www.instagram.com/abhijeetsawant73/?hl=en
यूट्यूबhttps://www.youtube.com/channel/UCDluSwAIDwbpe62fVVX1HqA
फेसबुकhttps://www.facebook.com/AbhijeetSawantlive/
इंस्टाग्राम वरच्या फौलोअर्स ची संख्या4.15 लाख

शो, अल्बम आणि सिनेमांची यादी:-

वर्षशोचं नावचॅनेल
2004इंडियन आयडॉल सीजन 1 – गायक (स्पर्धक तसेच अंतिम विजेता)सोनी टीव्ही
2005सी. आय. डी. – पाहूणा कलाकारसोनी टीव्ही
2006कैसा ये प्यार हैं – पाहूणा कलाकारसोनी टीव्ही
2008जो जीता वही सुपरस्टार – गायक (उपविजेता)स्टार प्लस
2008एशियन आयडॉल – गायक (दुसरा उपविजेता)सोनी टीव्ही
2008नच बालिये – डान्सर (स्पर्धक)स्टार प्लस
2010इंडियन आयडॉल सीजन 5 – सहयजमानसोनी टीव्ही
2011कॉमेडी सर्कस – हास्य कलाकारसोनी टीव्ही
2015कॉमेडी नाईट्स विथ कपिल – हास्य कलाकारसोनी टीव्ही
2018लव्ह मी इंडिया – गुरुअँड टीव्ही
वर्षसंगीत अल्बमचे नावलेबल
2005आपका अभिजीत सावंत सोनी बी.एम.जि. मुसिक इंडिया
2007जुनूनसोनी बी.एम.जि. मुसिक इंडिया
2013फरीदायुनिवर्सल मुसिक इंडिया
2018दिल फकिरायुनिवर्सल मुसिक इंडिया
वर्षगाण्याचे नावचित्रपटाचे नावभाषा
2005मर जावा मीट जावा (पार्श्वगायक)आशिक बनाया आपनेहिंदी
2006याद तेरी याद (पार्श्वगायक)जवानी दिवाणी – अ युथफूल जॉयराइडहिंदी
2006रेशमी पाऊल तुझेहिरव कुंकूमराठी
2008खेळ हा वेडा दिवाना (पार्श्वगायक)भोळा शंकरमराठी
2010हॅपी एंडिंग (पार्श्वगायक)तीस मार खानहिंदी
2012बेचे सपने (पार्श्वगायक)चिटगाँवहिंदी
2013सर सुखाची श्रावणीमंगलाष्टके वन्स मोरमराठी
2014बिटिंग बिटिंग (पार्श्वगायक)इश्क वाला लव्हमराठी
2015ये ना (पार्श्वगायक)बाजीमराठी
2016इश्क (पार्श्वगायक)डिशुमहिंदी
वर्षचित्रपटाचे नावपात्राच नावभाषा
2009लॉटरीरोहित अवस्थीहिंदी

मुसिकल व इतर व्हिडीओ:-

Big Boss Season 5 मधील प्रवास:-

सध्या अभिजीत सावंत बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये आपल्याला स्पर्धक म्हणून दिसत आहे. या शोला सध्या १ महिना पूर्ण झाला असून अभिजीत एक उत्तम खेळाडू म्हणून आपल्या सगळ्यांसमोर आला आहे. टास्कची उत्तम समज, खेळाडूवृत्ती अभिजीत कडे आहेच हेच आपल्याला करन्सी टास्क पाहायला मिळालं. अभिजीतच्या पायाला दुखापत असून देखील त्याने या टास्क मध्ये प्रदर्शन करण्याचे ठरवले आणि या मुळेच या सफ्ताहमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी अभिजीतच्या खेळाचे खूप कौतुक केले. अंतिम फेरीत जाऊन बिग बॉस सीजन ५ चा विजेता होण्याचे स्वप्न अभिजीत बाळगत आहे आणि तो त्याचे स्वप्न पूर्ण करू शकेल का? हे आपल्याला पुढील ६० दिवसांमध्ये समजणारच आहे. त्याचा हा खेळ तुम्ही बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये पाहू शकता.

निष्कर्ष:-

परिस्तिथी कशी हि असो किंवा संसाधने कितीही कमी असो स्वतःवर आत्मविश्वास असेल तर व्यक्ती स्वतःची स्वप्ने पुरे करू शकतो हे आपल्याला Abhijeet Sawant Biography In Marathi या ब्लॉगद्वारे कळते. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असल्यास आम्हाला खाली दिलेल्या इमेल आयडी वर रिप्लाय करून तुमचा फीडबॅक देऊ शकता.

E-Mail Id – Marathitube24@gmail.com

Big Boss Marathi Season 5 मधील इतर स्पर्धाकांबद्दल जाणून घ्या

Varsha UsgaonkarNikki TamboliPandharinath KambleSuraj ChavanVaibhav ChavanAnkita Prabhu Walawalkar