Varsha Usgaonkar Biography in Marathi | वर्षा उसगांवकर यांची बायोग्राफी

Varsha Usgaonkar Biography in Marathi

मराठी सिनेश्रुष्टी मध्ये वर्षा उसगांवकर यांचे नाव हे एव्हरग्रीन अभिनेत्रींच्या यादीत नक्कीच येते. त्यांनी कित्येक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अनेक दशके काम करून आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेआहे. 90च्या दशकाचा मराठी सिनेमाचा काळ ह्या त्यांनी गाजवला आहे. त्यांनी अभिनयासोबतच, मॉडेलिंग व गायन हि केले आहे. या ब्लॉगद्वारे त्यांच्या जीवनचरित्रा (Varsha Usgaonkar Biography in Marathi) बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

Varsha Usgaonkar Biography in Marathi | वर्षा उसगांवकर यांची बायोग्राफी

Varsha Usgaonkar Biography in Marathi

सुरवातीचे आयुष्य:-

वर्षा उसगांवकर यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1968 रोजी गोव्यातील उसगांव या गावी झाला. त्यांचे वडील ए. के. एस. उसगांवकर हे गोव्यातील कॅबिनेट मंत्री होते आणि त्यांची आई मणिकाबाई या शास्त्रीय संगीत गायिका होत्या. कोंकणी हि त्यांची मातृभाषा आहे. पंडित सुधाकर करंदीकर यांच्या मार्गदर्शनखाली वर्षा यांनी शास्त्रीय संगीताचे कौशल्य आत्मगत केले तसेच वर्षा ह्या गोव्यामध्येच आपले बी. कॉम. चे शिक्षण घेत असतानाच नाटक क्षेत्रात सहभागी होत असत आणि इथूनच त्यांच्या अभिनय क्षेत्राची सुरवात झाली होती.

करिअर:-

वर्षा यांना खरी प्रसिद्धी हि 1982 साली आलेला ब्रह्मचारी या नाटकाद्वारे भेटली या मध्ये त्या प्रमुख अभिनेत्री होत्या आणि त्यानंतरच त्यांच्या फिल्मी प्रवासाला हि सुरवात झाली. एका पाठोपाठ एक असे सुपरहिट चित्रपट त्यांनी केले जसे की गंमत जंमत, हमाल दे धमाल, सगळीकडे बोंबाबोंब, सवत माझी लाडकी, शेजारी शेजारी, एक होता विदूषक, लपंडाव, अफलातून आणि इतर बरेच असे चित्रपट. त्यांनी पुढे बॉलीवूड मध्ये हि काही चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या जसे कि घर आया मेरा परदेसी, पथरीला रास्ता. तिरंगा, मिस्टर या मिस तसेच 2005 साली आलेला बॉलीवूड चित्रपट मंगल पांडे दि रायझिंग या मध्ये त्यांनी सहाय्यक कलाकार म्हणून देखील काम केले आहे.
पुढे त्यांनी फैसल सैफ यांनी दिग्दर्शित केलेला विवादित हिंदी चित्रपट जीग्यासा मध्ये ह्रिषीता भट यांच्या आईचा भूमिकेत काम केले आहे.

वर्षा यांनी आपल्या टेलिव्हिजनच्या करिअर ची सुरवात सुप्रसिद्ध अश्या महाभारत या मालिकेपासून केली. यामध्ये त्यांनी उत्तरा हे पात्र केले आहे. जी अभिमन्यूची पत्नी व परीक्षितची आई असते. नंतर त्यांनी खूप सारे हिंदी चित्रपट केले परंतू ते चित्रपट बॉक्स ऑफिस वर कमाल करण्यामध्ये अयशश्वी ठरले. चंद्रकांता या प्रसिध्द मालिकेमध्ये त्यांनी रूपमती जी नागीण राणी हे पात्र केले आहे. पुढे त्यांनी आकाश झेप आणि एका मेकांसाठी या मराठी मालिका देखील केल्या आहेत. अलविदा डार्लिंग, तनहा, अनहोनी यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले.

1990 च्या काळात झांसी कि राणी या दूरदर्शन वरील मालिकेत त्यांनी प्रमुख भूमिका म्हणजेच राणी लक्ष्मीबाई यांचं पात्र केल होतं. आपल्या अभिनयाची छाप ह्या पात्राद्वारेच त्यांनी पाडली होती. वर्षा यानी उल्हास बुयाओ सोबत मिळून रूप तुझेम लायता पिक्सएम ह्या अल्बम मध्ये गायन देखील केले आहे. हल्लीच त्यांनी स्टार् प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेमध्ये नंदिनी यशवंत शिर्के यांच्या भूमिकेत सहाय्यक कलाकार म्हणून काम केले आहे आणि आता त्या बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये स्पर्धक म्हणून आल्या आहेत.

वैयक्तिक आयुष्य :-

वर्षा यांना २ बहिणी असून तोषा कुराडे आणि मनीषा तारकर अशी त्यांची नावे आहेत. 80च्या दशकात नितीश भारद्वाज व वर्षा यांमध्ये दीर्घ काळापर्यंत मैत्री होती. साल 1991 मध्ये दोघांनी हि वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. पुढे वर्षा यांनी रवी शंकर शर्मा जे भारतीय चित्रपटामध्ये संगीत दिग्दर्शक होते त्यांचा मुलगा अजय शर्मा यांच्या सोबत मार्च 2000 साली विवाह केले.

सिनेमांची यादी:-

वर्षचित्रपटाचे नावपात्राच नावभाषा
1986तुझ्या वाचून करमेनाडॉलीमराठी
1987गंमत जंमतकल्पना कोरडेमराठी
1987खट्याळ सासू नाटाल सूनमाया जगडेमराठी
1988मज्जाज मज्जाकामिनी प्रताप सिंगमराठी
1988रेशीमगाठीशिंपलीमराठी
1989सगळीकडे बोंबाबोंबरजनी बालामराठी
1989हमाल दे धमालनंदिनी पटवर्धनमराठी
1989आत्मविश्वासनिशामराठी
1989भुताचा भाऊअंजलीमराठी
1989पसंत आहे मुलगीमधुमती धुरंधरमराठी
1989नवरा बायकोवर्षामराठी
1990दूध का कर्जकजरी लोहारहिंदी
1990शेजारी शेजारीप्रीतीमराठी
1990आमच्या सारखे आम्हीचनंदिनी देशपांडेमराठी
1990चंगु मंगूवर्षामराठी
1990घनचक्करवर्षामराठी
1990पटली रे पटलीनंदामराठी
1990कुठे कुठे शोधू मी तुलासुजातामराठी
1990बाप रे बापनयनामराठी
1990डोक्याला ताप नाहीवंदनामराठी
1991शिकारी दि हंटरचंचलरशियन
1991साथीनिशाहिंदी
1991हफ्ता बंदमारियाहिंदी
1991अफलातूनबिट्टीमराठी
1991मुंबई तो मौरिशियसआरती/भारतीमराठी
1991येडा कि खुळाआरती दिवेकरमराठी
1991जीव सखापारूमराठी
1992सोने कि जंजीरसोनालीहिंदी
1992हनिमूनआशा एस. वर्माहिंदी
1992दिलवाले कभी ना हारेशबनमहिंदी
1992घर जमाईमोनाहिंदी
1992माल मसालावर्षा देशमुखमराठी
1992शुभ मंगल सावधानजयामराठी
1992सोने कि लंकारोमाहिंदी
1993सवत मी माझी लाडकीडॉ. बिना कर्णिकमराठी
1993एक होता विदूषकमेणकामराठी
1993तिरंगाशांतीहिंदी
1993परवानेसुजीहिंदी
1993इंसानियात के देवताहुसन बानोहिंदी
1993लपंडावरसिका समर्थमराठी
1993ऐकावे ते नवलचडॉ. वंदनामराठी
1993पैसा पैसा पैसातनुजा(तनु) केळकरमराठी
1993हस्तीअनिताहिंदी
1993परदेसीशंकर जिच्या प्रेमात पडतोहिंदी
1993खलनायिकावर्षा शर्माहिंदी
1993घर आया मेरा परदेसीराधाहिंदी
1994पथरिला रास्तामोनाहिंदी
1994बेटा हो तो ऐसामीनीहिंदी
1994यज्ञ निशा मराठी
1995पैंजण जास्वन्तीमराठी
1995जमलं हो जमलं राधा मराठी
1995दुश्मनी अ वायोलेन्ट लव्हस्टोरी डान्सर हिंदी
1995अबोली मोना मराठी
1995जखमी कुंकू राजलक्ष्मी मराठी
1996शोहरत निखिल ची बायको हिंदी
1996मुकदमा सीमा हिंदी
1997घर जमाई मिस चमचम हिंदी
1998हसते हसते वर्षा हिंदी
1998पैज लग्नाची पूजा मराठी
1998बायको चुकली स्टॅण्डवर हौसा/श्रीबेबी मराठी
1999रंग प्रेमाचा चंपा मराठी
1999नवरा मुंबईचा गौरी मराठी
1999धांगड धिंगा मधुरा मोने मराठी
1999लढाई सुनीता नाडकर्णी मराठी
1999चेहरा माहिती अस्तित्वात नाही हिंदी
1999सी तो अबर कचे इले इशिता बंगाली
2001ध्यास पर्व शकुंतला परांजपे मराठी
2001स्टाईलपोलीस इन्स्पेक्टर हिंदी
2003बाप का बाप उमा दीक्षित हिंदी
2004हत्या दि मर्डर कविता जैस्वाल हिंदी
2004साक्षात्कार सौदामिनीमराठी
2005सवाल माझा प्रेमाचा जयश्री कराडकर मराठी
2005मंगल पांडे राणी लक्ष्मीबाई हिंदी
2005मिस्टर या मिस देवी पार्वती हिंदी
2006जीग्यासा टीचर मालिनी माथूर हिंदी
2009मरे पर्यंत फाशी जेलर ची बायको मराठी
2010बायको झाली गायब हौसा मराठी
2010लाडीगोडी रेखा मराठी
2011अर्जुन माया ठाकरे मराठी
2013थोडं तुझं थोडं माझं मालती मराठी
2013दुनियादारी राणी माँ मराठी
2013नाम प्रदर्शित झाला नाही प्रदर्शित झाला नाही
2014सुपर नानी चांदणी हिंदी
2014हुतूतू मधू मराठी
2014कॅपुचिनो सुनंदा मराठी
2016कंगना कंगना राजस्थानी
2016अर्धांगिनी एक अर्धसत्य नूर ची बायको   हिंदी
2017भविष्याची ऐसी तैसी मेघाची आई मराठी
2017ओली कि सुखी वकीलमराठी
2018झान्व्हॉय नंबर १दिआणा ची सासू कोंकणी
2018माधव एव्हरी चाईल्ड नीड मेंटॉर शारदा मेहता मराठी
2019बेंडकर जेस्सी कोंकणी
2022हवाहवाई वर्षा मराठी
2022शेर शिवराजबडी बेगममराठी
वर्षमालिकेचं नावपात्राचं नावभाषा
1988महाभारतउत्तरा हिंदी
1994राणी लक्ष्मीबाईराणी लक्ष्मीबाई हिंदी
1994चंद्रकांतारूपमती नागराणी हिंदी
1995आहट १वर्षा हिंदी
1998घर जमाईमिस चमचम हिंदी
2001विष्णू पुराणमोहिनी हिंदी
2005तुज्याविनासई देशमुखमराठी
2009-2011मन उधाण वाऱ्याचेअनुराधा मोहिते मराठी
2014जमाई राजाकृतिका खुराणा हिंदी
2020-2024सुख म्हणजे नक्की काय असतंनंदिनी शिर्के पाटील माईसाहेब मराठी
2024-presentबिग बॉस सीजन ५स्पर्धकमराठी

मालिकांची यादी:-

वर्षमालिकेचं नावपात्राच नावभाषा
1988महाभारतउत्तरा हिंदी
1994राणी लक्ष्मीबाईराणी लक्ष्मीबाई हिंदी
1994चंद्रकांतारूपमती नागराणी हिंदी
1995आहट १वर्षा हिंदी
1998घर जमाईमिस चमचम हिंदी
2001विष्णू पुराणमोहिनी हिंदी
2005तुज्याविनासई देशमुखमराठी
2009-2011मन उधाण वाऱ्याचेअनुराधा मोहिते मराठी
2014जमाई राजाकृतिका खुराणा हिंदी
2020-2024सुख म्हणजे नक्की काय असतंनंदिनी शिर्के पाटील माईसाहेब मराठी
2024-presentबिग बॉस सीजन ५स्पर्धकमराठी

पुरस्कार:-

१९८७ विजेती महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चित्रपट- गंमत जंमत
१९८९ नामांकन महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चित्रपट- हमाल दे धमाल
१९९२ नामांकन महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चित्रपट- एक होता विदूषक
१९९३ नामांकन महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री चित्रपट- सवत माझी लाडकी
१९९८ विजेती महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चित्रपट- पैज लग्नाची
१९९८ नामांकन फिल्मफेअर पुरस्कार– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चित्रपट- पैज लग्नाची

Big Boss Season 5

Pandhrinath Kamble Nikki Tamboli

निष्कर्ष :-

बिग बॉस सीजन ५ मध्ये वर्षा ताई या उत्तम खेळ खेळतच आहेत आणि प्रेक्षकांचं भरगोस प्रेम देखील त्यांना मिळत आहे. Varsha Usgaonkar Biography in Marathi यांच्या जीवनचरित्राबद्दल वरील ब्लॉग मध्ये आपण जाणून घेतले. वरील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला खाली दिलेल्या इमेल आयडी वर रिप्लाय करून तुमचा फीडबॅक देऊ शकता.

E-Mail Id- Marathitube24@gmail.com

आमच्या बद्दल जाणून घ्या.

Www.Marathitube.com