Ankita Prabhu Walawalkar Biography
अंकिता प्रभु वालावलकर म्हणजेच आपली लाडकी “कोंकण हार्टेड गर्ल“. जिचं बालपण हे देवबाग, मालवण, सिंधुदुर्ग येथे गेले. गाव ते मुंबई आणि मुंबई ते थेट मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि व्यवसायिका बनवण्यापर्यंतचा प्रवास हा कसा होता हे आपण तिच्या Ankita Prabhu Walawalkar Biography या ब्लॉगद्वारे पाहुयात.
सुरवातीचे आयुष्य:-
अंकिताचा जन्म १६ फेब्रुवारी १९९५ रोजी देवबाग, मालवण, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र येथे झाला. अंकिताच बालपण हे देवबाग,मालवण मधेच गेले. तिचे वडील हे देवबाग जे मालवण मधील एक सुप्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे तेथे ते होम स्टेचा व्यवसाय करतात. अंकिताला दोन बहिणी देखील आहेत. अंकिताने तिचे शालेय शिक्षण हे येथेनुच पूर्ण केले नंतर तिने आपले सिविल अभियांत्रिकीचे शिक्षण MITM कॉलेज, ओरस, सिंधुदुर्ग येथून पूर्ण केले.
करिअर:-
आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला HPCL या कंपनी मध्ये नोकरी लागली आणि त्या नंतर ती मुंबईमध्ये स्थलांतरित झाली.
सुरवातीला अंकिता टिक टॉक या प्लॅटफॉर्म द्वारे आपले विचार हे लोकांना पर्यंत पोहोचवत होती. कोविड 19 च्या नंतर टिक टॉक हे भारतीय सरकारने बंद केले त्या नंतर अंकिताने इंस्टाग्राम तसेच यूट्यूब वर आपले विचार मांडण्यास सुरवात केली. रोखटोक बोलणे, परखड मते, स्पष्ट विचारसरणी ह्या तिच्या गोष्टी लोकांना आवडू लागल्या आणि पाहता पाहता तिचा चाहता वर्ग वाढू लागला. यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर तिला चांगला प्रतिसाद भेटत होता आणि इथूनच तिचा कन्टेन्ट बनवण्याचा प्रवास सुरु झाला आणि “कोकण हार्टेड गर्ल” म्हणून ती प्रसिद्ध झाली. या भरगोस मिळणाऱ्या यशा नंतर तिने तिने आपली कॉर्पोरेट नोकरी सोडून देण्याचा विचार केला व आपल्याला व्यावसायिका बनायचे आहे असे मनाशी ठरवले.
कोंकणाबद्दलची तिला वाटणारी आपुलकी आणि कोंकण हा विविधतेने नटलेला तर आहेच त्या सोबतच कोंकणी माणसाला व्यवसाय करण्यास खूप वाव आहे असे अंकिताला सतत वाटत होते.आपल्याला हि उद्योजक बनायचे आहे या आशेने तिने आपली पाऊले पुढे टाकण्यास सुरुवात केली.
कोंकण हा आंबे, फणस, काजू अश्या विविध पदार्थांसाठी सुप्रसिद्ध आहे आणि यांसारख्या पदार्थांची बाजारपेठेत देखील खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ह्या संधीचं सोन करण्याचे अंकिताने ठरवले व आपण हि ह्या क्षेत्रात काम करू शकतो या जिद्दीने तिने आंबा निर्यात करण्याचे ठरवले. Covid १९ च्या काळात मागणी जास्त आणि पुरवठा कमी होत होता आणि अंकिताला ह्या काळात चांगलाच प्रतिसाद मिळाला. या व्यवसायासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर तिने पुरेपूर केला. अनेक ग्राहक तिला या प्लॅटफॉर्म्सद्वारे संपर्क करू लागले आणि अश्या रीतीने अंकिताचं व्यावसायिका बनण्याचे स्वप्न हे पूर्ण झाले.
अंकिताच्या वडिलांचे देवबाग, मालवण, सिंधुदुर्ग या त्यांच्या गावी होम स्टे देखील आहे आणि या होम स्टेच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी देखील अंकिताने सोशल मीडियाचा पुरेपूर उपयोग करून घेतला व त्याचे बरेचसे वैशिष्ठे तीने आपल्या यूट्यूब द्वारे लोकांना सांगण्यास सुरुवात केली.
मेहनत व जिद्दीच्या बळावर अंकिता हि अभियंता, कन्टेन्ट क्रिएटर, शिक्षिका, यूट्यूब व्लॉगर आणि एक महिला व्यवसायिका म्हणून लोकांसमोर उदयास आली. तिचा हा प्रवास मराठी महिला तसेच पुरुषांकरिता प्रेरणादायी आहे.
वैयत्तिक माहिती:-
नाव | अंकिता प्रमोद प्रभू-वालावलकर |
टोपण नाव | कोंकण हार्टेड गर्ल |
जन्म दिनांक | 16-Feb-1995 |
वय | 29 वर्षे आतापर्यंतचे |
प्रोफेशन | कन्टेन्ट क्रिएटर, व्यवसायिका, व्लॉगर |
शिक्षण | सिविल अभियंता |
कॉलेज | MITM कॉलेज |
बहिणींची नावे | प्राजक्ता वालावलकर, ऋतुजा वालावलकर |
सध्याचे राहत असलेलं शहर | मुंबई, महाराष्ट्र, इंडिया |
जन्मठिकाण | देवबाग, मालवण, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र |
वैवाहिक स्तिथी | अविवाहित |
धर्म | हिंदू |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
अंकिता १६ वर्षांची असताना ती एका मुलाच्या प्रेमात पडली आणि तो मुलगा तिच्यापेक्षा १०-१२ वर्षांनी मोठा होता. अंकिताच्या घरातले वातावरण खूप कडक शिष्तीचे होते आणि तिच्या घरच्याना तिचे हे प्रेमप्रकरण अमान्य होते. याच कारणामुळे अंकिता जेव्हा १८ वर्षांची झाली तेव्हा तिने घर सोडून जाण्याचा विचार केला व त्या मुलाच्या घरी राहू लागली.
अंकिता तिच्या या निर्णयामुळे खूप मोठ्या अडचणीत सापडली. आपण घेतलेला निर्णय हा खूप चुकीचा आहे याची तिला जाणीव झाली. दोघांच्या वयामधील असलेलं अंतर तसेच इतर अनेक कारणांमुळे अंकिता व त्या मुलामध्ये भांडणे होऊ लागली. आपला खून हि होऊ शकतो अशी भीती तिला वाटू लागली.
त्या मुलाची आई अंकिताची हि स्तिथी समजत होती आणि या बाबतीत तिने अंकिताला तिचा निर्णय घेण्यास सांगितले. अंकिताने मग ह्या नात्याला पूर्णविराम देण्याचे ठरवले व ती पुन्हां आपल्या गावी परतली. तिच्या ह्या निर्णयाचे घरातल्यांनी स्वागत केले.
सध्या अंकिताच लग्न हे ठरलेलं आहे परंतु ते कोणाशी होत आहे याबाबत अंकिताने सोशल मीडियावर अद्याप सांगितले नाही आहे. परंतु तिला अनेकदा महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने सोबत पहिले गेले आहे व ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत अशी अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत आहे.
सध्या अंकिता बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये स्पर्धक म्हणून आपल्याला दिसत आहे आणि याच शो मध्ये तिने तिची सह स्पर्धक योगिता सोबत आपल्या वैयत्तिक आयुष्याबद्दल बोलत असताना असे सांगतले कि तिचं लग्न हे ठरले आहे आणि होकाराआधी मुलाला एक अट घातली आणि ती अट अशी होती कि गणेशोत्सवनिमित्त ती तिच्या माहेरीच म्हणजेच देवबाग येथे जाईल आणि याच स्पष्टीकरण देत तिने सांगतले कि आपल्याला भाऊ नाही आणि आई वडील दोघेच असणार आणि लग्नानंतर तिन्हीही बहिणी माहेरी जाणार तर गणेशोत्सवाची जबाबदारी आपल्या आई वडिलांवर पडणार यामुळे ती ७ हि दिवस आपल्या माहेरी राहणार असे सांगितले.
सासर आणि माहेर दोन्हीही ठिकाणे ७ दिवसांचा गणपती असल्याकारणाने अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला असे सुचवले कि माहेरचा गणपती हा ९ दिवस साजरा करायचा आणि सासरी गणेशोत्सव झाल्यावर शेवटचे २ दिवस माहेरी जायचे. परंतु अंकिताला हा विचार काही पटला नव्हता. शेवटी अंकिताच्या या निर्णयाचे तिच्या होणाऱ्या नवऱ्याने मान राखले व या गोष्टीसाठी सहमती दर्शवली. गणपतीची पूर्वतयारी झाली कि सासरी दोन दिवस राहून पुन्हा आपल्या माहेरी येणार असल्याचे अंकिताने त्यांना सांगितले.
वाद:-
बारसू, रत्नागिरी, महाराष्ट्र येथे रिफायनरी प्रकल्प होणार असे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आणि याच रिफायनरीच्या विरोधात त्या गावातील तसेच इतर आजू बाजूच्या गावातील लोकांनी प्रचंड प्रमाणात विरोध दर्शवला अनेक आंदोलने देखील झाली. कोंकणातील सगळे मराठी इन्फ्लुएन्सर यांनी देखील आपला आवाज उठवला परंतु अंकिताने या प्रकलपच्या समर्थनार्थ एक व्हिडीओ टाकला त्यानंतर ती सोशल मीडिया वर खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली अनेकांनी तिच्या या समर्थनामुळे टीका करायला सुरवात केली.
अंकिता पुन्हा एकदा वादात अडकली जेव्हा तिने नव्याने सुरु केलेल्या स्टोरला सांभाळण्यासाठी एका मुलीची गरज असल्याची जाहिरात दिली आणि तिथे स्टोरच्या इतर कामांसोबतच साफसफाई हि करावी लागेल अशी अट सांगितली. अंकिताने त्या कामासाठी इच्छुक असलेल्या एका मुलीची मुलाखत घेतली परंतु त्या मुलीने साफसफाई करण्यास मनाई केली. अंकिताने प्रतिक्रिया म्हणून या विषयावर व्हिडीओ बनवला आणि आपली खंत व्यक्त केली. परंतु लोकांनी या उलट तिला खूप ट्रोल करण्यास सुरवात केली. कंमेंटमध्ये एका चाहत्याला रिप्लाय देत असताना तिने म्हटले कि “दहा हजार पगार घेणाऱ्या मुलीने सेल्फ रिस्पेक्ट बद्दल बोलू नये” या तिच्या कंमेंट ला घेऊन तिचे चाहते आणखी खवळले आणि याविरुद्ध तिला खूप साऱ्या टिकेच्या कंमेंट्स आल्या.
सोशल मीडिया बद्दल माहिती :-
इंस्टाग्राम | https://www.instagram.com/kokanheartedgirl/?hl=en |
यूट्यूब | https://www.youtube.com/channel/UCwJX3BmQSg0lt_0XQhBRhPQ/about |
फेसबुक | https://www.facebook.com/ankita.prabhuwalawalkar/ |
इंस्टाग्राम वरच्या फौलोअर्स ची संख्या | 8.62 लाख |
मुसिकल व इतर व्हिडीओ:-
Big Boss Season 5 मधील प्रवास:-
रोखठोक स्वभाव आणि सोशल मीडियावर चांगलीच प्रचलित असल्या कारणाने अंकिताला बिग बॉस मराठी सीजन ५ या शो साठी ऑफर आली आणि तिने यात स्पर्धक म्हणून जाण्याचे ठरवले. अंकिता या खेळात उत्तम असा खेळ खेळत आहे आणि हे पाहून तिचे चाहते देखील प्रचंड खुश आहेत. तिचा मालवणी स्व्याग आणि मालवणी भाषा लोकांना खूप आवडत आहे आणि रितेश देशमुख यांनी देखील तिचे वेळोवेळी कौतुक केले आहे.
या शोमध्ये निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यात लहान बाळाच्या टास्क दरम्यान वाद झाला आणि निक्की वर्षा ताईंना उलटं बोलत होती आणि या वेळी अंकिताने वर्षा ताईंची बाजू घेत निक्कीला चांगलाच खडसावलं होत आणि अन्यायाविरुद्ध उभा राहताना अंकिताला आपण अनेक वेळा ह्या शो मध्ये पाहिले आहे. कोणतेही टास्क असो अंकीता आपले १००% देते आहे. नुकत्याच झालेल्या बी बी करन्सी ह्या टास्कमध्ये अंकिताने समोरील स्पर्धकांना चांगली टक्कर देत तो टास्क जिंकला व तिच्या सोबत खेळणाऱ्या सर्व स्पर्धकांनी तिचे आभार मानले कारण हा टास्क जिंकूनच घरातल्याना राशन हे भेटणार होते. या शोला सध्या १ महिना पूर्ण झाला आणि अंकिता हि एक चांगली खेळाडू म्हणून उभरून येत आहे. येणाऱ्या काळात आपल्या समजलेच कि अंकिता तिचा हा प्रवास किती काळपर्यँत टिकवून ठेवते व तिचे अंतिम फेरीत जाऊन ट्रॉफी उचलण्याचे स्वप्न पुरे करते.
निष्कर्ष:-
Ankita Prabhu Walawalkar Biography In Marathi या ब्लॉगद्वारे आपल्याला हेच समजते मेहनत, जिद्ध, चांगली विचारसरणी, व्यवसाय करण्याचे धाडस हि कौशल्ये अंगी असतील तर सामान्य माणसाला हि या जगात आपले वेगळे असे स्थान निर्माण करता येऊ शकतो. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असल्यास आम्हाला खाली दिलेल्या इमेल आयडी वर रिप्लाय करून तुमचा फीडबॅक देऊ शकता.
E-Mail Id – Marathitube24@gmail.com