Suraj Chavan Biography In Marathi
सुरज चव्हाण हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तो मराठी मध्ये डिजिटल कन्टेन्ट बनवतो. सुरज हा त्याच्या वेगळ्या अश्या डायलॉग बोलण्याच्या पद्धतीने आणि हटके अश्या स्टाईलने मराठी रसिकांच्या मनावर टिकटॉक च्या काळापासूनच राज्य करत आलेला आहे. गरिबीशी झगडत आणि काही तरी उत्पन्न निर्माण करता येऊ शकतं या हेतूने त्याने टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर विनोदी विडिओ टाकण्यात सुरुवात केली. हळूहळू त्याचे व्युस आणि फावलोअर्स वाढत गेले आणि सुरज हा प्रसिद्ध झाला. त्याच्या मेहनतीचं फळ म्हणूनच बिग बॉस मराठी सीजन 5 या शो साठी त्याला आमंत्रण आले आणि त्यानी ते स्वीकारले. सुरजचा या शो पर्यंत पोहोचण्याचा प्रवास आपण त्याच्या बायोग्राफी (Suraj Chavan Biography In Marathi) द्वारे पाहणार आहोत.
सुरवातीचे आयुष्य:-
सुरज चव्हाणचा जन्म 1994 साली बारामतीच्या मोढावे या गावी झाला. सुरज चे बालपण हे खूप कठीण परिस्तिथीतुन आणि अनेक संकटेही त्यावर येऊन गेली आहेत. सुरज हा अत्यंत गरीब अश्या कुटुंबातून येतो आणि त्याचे आई वडील तो लहान असतानाच वारले. सुरजच्या वडिलांना कँसर झाले होते आणि दुर्देवाने त्यांचे निधन झाले. याच काळात सुरजची आई आणि आजी देखील एकाच दिवशी वारले. हाच तो दिवस होता ज्यामुळे सुरज आणि त्याच्या 5 बहिणी ह्या पोरक्या झाल्या. सुरज अनाथ तर झालाच परंतु घरातली संपूर्ण जबाबदारी हि त्या वर पडली .
आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी त्याने शेतमजूरी, बिगारी काम अशी बरीचशी कामे केली. अथक मेहनतीच्या जोरावर तो त्याची परिस्तिथी बदलण्यासाठी खूप प्रयत्न करत होता. त्याची परिस्तिथी एवढी हलाकीची होती कि कधी कधी घरी खाण्यासाठी काही नसले तर त्याने त्याच्या गावातच असलेल्या आई मरीमातेच्या मंदिरातला प्रसाद खाऊन हि दिवस काढलेले आहेत.
अश्यातच त्याला आपले शालेय शिक्षण इय्यता 8 वी पर्यंतच करता आले. परंतु त्याची स्वप्ने हि खूप मोठी होती आणि त्याला व्हिडीओ बनवायची आवड तर होतीच आणि अश्यातच त्याच्या भाच्याने त्याला व्हिडीओ बनवण्यास सांगितले. टिक टॉक या तेव्हाच्या प्रसिद्ध झालेल्या सोशल मीडियावर आपले हटके असे व्हिडीओ टाकण्यास सुरवात केली. सुरवातीला त्याच्या या व्हिडिओंना खूप सारे लोक घाण घाण कंमेंट आणि टीका करत होते. परंतु त्याचा तो गावराण अंदाज महाराष्ट्रातील गावतल्या लोकांना आवडू लागला. हळू हळू त्याचा चाहता वर्ग वाढला आणि त्याच्या त्या व्हिडिओना लाईक्स आणि कंमेंट्स येऊ लागले. त्याचे वेग वेगळे डायलॉग्स आणि हटके अंदाज पाहून लोक हसल्याविना राहत नव्हते आणि त्याचे व्हिडीओस वायरल व्हायला लागले.
“गुलिगत धोका” आणि “बुक्कीत टेंगुळ” या सारखे डायलॉग्स तर खूपच प्रसिद्ध झाले. Covid19 च्या काळात सरकारने टिकटॉक सारखे अनेक असे चायनीज ऍप्स बंद केले आणि यामुळे सुरज सारख्या अनेक कलाकारांचे नुकसान झालं.
करिअर:-
टिकटॉक बंद झाल्यावर इंस्टाग्राम ने त्याचे रील्स हा उपक्रम चालू केला. सुरज ने या प्लॅटफॉर्म वर हि आपले व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरुवात केली आणि टिकटॉकचे सगळे फौलव्हर्स पुन्हा सुरज ला रील्सवर फॉलो करू लागले आणि सुरजला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यात यश आले. मराठी रसिकांना हसवण्यामध्ये सुरज हा चांगलाच यशस्वी ठरला.
सुरजच्या याच प्रवासदरम्यान त्याला मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. 2023 साली आलेला ” मुसंडी” आणि 2024 साली आलेला “राजा राणी” यांसारख्या चित्रपटांमध्ये सुरज ने आपले अभिनय कौशल्य दाखवले. एक कन्टेन्ट क्रिएटर ते अभिनय पर्यंतचा सुरज हा प्रवास हा वाखान्याजोगा आहे.
सुरजला हीच प्रसिद्धी बिग बॉस मराठी सीजन 5 या शो मध्ये एक स्पर्धक म्हणून घेऊन आली. सुरजची एंट्री तर या शो मध्ये धमाकेदार झालीच त्या बरोबरच बऱ्याच लोकांनी त्याला या शो मध्ये आणण्यावर प्रश्नचिन्ह केले परंतु जमिनीशी जुडला गेलेला एक व्यक्ती आणि आपल्या भोळ्या स्वभावाने सुरजने अनेक प्रेक्षकांचे हृदय जिंकले. कितीतरी लोक जे बिग बॉस हा शो पाहत नव्हते त्यांनी हि हा शो फक्त सुरज चव्हाण साठी पाहायला सुरुवात केली आहे. आता सगळे सुरज चव्हाण ला अंतिम सफ्ताह पर्यंत पाहण्यास उत्सुक आहेत व चाहत्यांमध्ये सुरज हा भन्नाट असा नव्याने प्रसिद्ध झाला आहे.
परिस्तिथी कशी हि असो माणूस जिद्दीच्या जोरावर कुठवर मजल मारू शकतो याच एक उत्तम उदाहरण म्हणजे सुरज चव्हाण. लहानपणीच दुःखाचं डोंगर कोसळलं असूनही सुरज ने कधी हार मानली नाही. एक सामान्य गरीब कुटुंबातला मुलगा गाव ते बिग बॉस अश्या प्रसिद्ध शोचा स्पर्धक बनतो व लोक त्याला डोक्यावर घेतात हे एका स्वप्नापेक्षा कमी नाही आहे. सूरजला स्वतःला अशी काही संधी भेटेल यायबाबतची कल्पना नसावी. आजच्या तरुण पिढीला सुरज कडून खूप सारख्या गोष्टी या शिकण्या सारख्या आहेत.
Big Boss Season 5 मधील प्रवास:-
सुरजने चव्हाणने धनंजय पवार यांच्यासह बिग बॉस सीजन ५ मध्ये एंट्री केली होती. त्यावेळेला वैभव सोडला तर त्याची फारशी कोणीही विचारपूस केली नाही. व्यक्तीच्या चेहरा तसेच पेहराव पाहून खूप लोकांनी त्याचे परीक्षण केले होते. पहिल्या हफ्त्यामध्ये सुरजला खेळ कसा खेळायचा आहे हे काही उमगत नव्हते. तो शांत शांत असा खेळत होता. नंतर भाऊचा धक्क्यामध्ये रितेश देशमुख तसेच बिग बॉस यांनी त्याचा आत्मविश्वास वाढवला व तो चांगली कामगिरी करू शकतो या बद्दल जाणून करून दिली. त्यानंतर तो थोडा खुलला व आपलं मत मांडणे तसेच टास्क मध्ये परफॉर्म करू लागला.
अक्षय कुमार आणि त्यांचे सह कलाकार त्यांचा चित्रपट खेल खेल में च्या प्रोमोशनसाठी बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये आले होते तेव्हा सुरज चव्हाण च्या झापूक झुपुक झापूक झुपुक या स्टेप वर डान्स देखील केले होते. एका सफ्ताहात कॅप्टन पदाच्या दावेदारीसाठी टास्क झाला आणि आपला सुरज अरबाज सारख्या धिप्पाड व्यक्तीला एकटाच भिडला होता. त्याचा हा खेळ पाहून सगळे स्पर्धक तर खुश झाले व त्या सोबतच बाहेर त्याचा हा खेळ पाहणारे दर्शक देखील खुश झाले.
बिग बॉस हा मानवी भावनांचा खेळ आहे आणि याच हेतूने बिग बॉस यांनी एक टेलिफोनची व्यवस्था केली होती. जिथे सगळ्या स्पर्धकांना आपल्या जीवनातील अश्या व्यक्ती सोबत बोलायचे होते जे सध्या मृत आहेत परंतु त्या व्यक्ती जिवंत असताना काही गोष्टी स्पर्धकांना त्यांना सांगायच्या राहून गेल्या व त्याच गोष्टी टेलिफोन वर व्यक्त करायच्या होत्या. जेव्हा सुरज ची वेळ आली तेव्हा सुरजने आपल्या भावना आई आणि वडिलांशी व्यक्त केल्या. कमी वयात त्याला का सोडून गेलात असा प्रश्न त्याने त्याच्या आई वडिलांना केला व तो नंतर रडू लागला त्याच हे रडणं पाहून अक्खा महाराष्ट्रही कदाचित रडला असेल.
मराठी कलाकार जे बिग बॉस मध्ये मागील सीजन मध्ये स्पर्धक म्हणून होते त्या सर्वानांच सुरजचा स्वभाव व तो ज्या रीतीने या खेळात खेळत आहे हे पाहून आनंद होत होता व त्याबद्दल एक वेगळीच आपुलकी निर्माण झाली होती. एका सफ्ताहात “अबीर गुलाल” या कलर्स मराठी वर प्रदर्शित होत असलेल्या मालिकेचे कलाकार अक्षय केळकर (बिग बॉस सीजन ४ चा विजेता), गायत्री दातार (बिग बॉस सीजन ३ मधील स्पर्धक) आणि पायल जाधव (नवोदित) हे बिग बॉस सीजन ५ मध्ये आले होते. त्या सर्वानीच सुरज चव्हाणच्या खेळाचे व त्याचे खूप कौतुक केले होते. शो च्या वेळेस रक्षाबंधन जवळच येत होता आणि सुरजने या आधी व्यक्त केले होते कि त्याला त्याच्या बहिणींची आठवण येत आहे आणि त्याचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे हि गोष्ट लक्षात घेऊनच पायल जाधवने सुरजला राखी बांधली होती आणि सुरजच मन गहिवरून आलं होतं.
सुरजचा चाहता वर्ग हा इतका होता कि त्याला जिंकवण्यासाठी त्याच्या तालुक्यामध्ये जागो जागी वोट करण्यासाठी पोस्टर्स तसेच फेल्क्स लागले होते. एका सामान्य व गरीब कुटुंबातला मुलगा हा शो जिंकावा असे तमाम लोकांना वाटत होते आणि चाहत्याचं हेच प्रेम सुरजला टॉप ६ मध्ये घेऊन आले शेवटी अंतिम दोन मध्ये त्याची लढत इंडियन आयडॉल अभिजीत सावंत सोबत होती. अखेर सुरज ला वोट जास्त मिळाल्याकारण्याने तो विजेता ठरला व तमाम महाराष्ट्रातले लोक व त्याचे चाहते खुश झाले.
एक सामान्य आणि गरीब कुटुंबातून येऊन इथ पर्यंत येणे या साठी मेहनत आणि नशीब या दोघांची गरज असते हे सुरजयाकडे पाहून समजते.
वैयक्तिक माहिती :-
खरे नाव | सुरज चव्हाण |
टोपण नाव | गुलिगत, सुरज चव्हाण गुलिगत |
प्रोफेशन | डिजिटल कन्टेन्ट क्रिएटर |
जन्म तारीख | वर्ष 1994 |
सध्याचे वय | 30 वर्षे |
कुटुंबाबद्दल माहिती | वडील – माहिती अद्यायावत करणे बाकी आहे आई – माहिती अद्यायावत करणे बाकी आहे बहीण- निमी, सीता, गीता, वैशाली, सविता |
जन्मठिकाण | मोळावे गाव, बारामती, महाराष्ट्र |
सध्याचे शहर | बारामती, महाराष्ट्र |
वैवाहिक स्तिथी | सध्या अविवाहित |
अफेर/गर्लफ्रेंड | माहिती अस्तित्वात नाही |
बायको | अविवाहित |
मुले/मुली | अविवाहित |
धर्म | हिंदू |
शैक्षणिक माहिती | इय्यता ८वी |
छंद | विनोदी व्हिडीओ बनवणे |
नागरिकत्व | भारतीय |
शो आणि सिनेमांची यादी:-
वर्ष | शो/सिनेमाचं नाव | भाषा |
2023 | मुसंडी-सहकलाकार | मराठी |
2024 | राजा राणी-सहकलाकार | मराठी |
2024 | बिग बॉस मराठी सीजन 5– विजेता | मराठी |
सोशल मीडिया बद्दल माहिती :-
इंस्टाग्राम | https://www.instagram.com/official_suraj_chavan1151/?hl=en |
यूट्यूब | https://www.youtube.com/@SurajChavanShorts |
फेसबुक | https://www.facebook.com/p/Suraj-Chavan-1151-100083194733241/ |
इंस्टाग्राम फौलोअर्स संख्या | 24 लाख |
शॉर्ट्स:-
निष्कर्ष:-
Suraj Chavan Biography In Marathi या ब्लॉग मधून आपणांस हेच कळते कि प्रतिकूल परिस्तिथी असली तरीही त्या वर मात कशी करायची हे सुरज चव्हाण या पठ्याकडून नक्कीच शिकण्यासारखा आहे. जर तुम्हाला सुरज चव्हाण ची बायोग्राफी आवडली असल्यास आम्हाला खाली दिलेल्या इमेल आयडी वर रिप्लाय करून तुमचा फीडबॅक देऊ शकता.
E-Mail Id – Marathitube24@gmail.com
Big Boss Marathi Season 5 मधील इतर स्पर्धाकांबद्दल जाणून घ्या
आमच्या बद्दल जाणून घ्या.