Pandharinath Kamble Biography In Marathi | पंढरीनाथ कांबळे यांची बायोग्राफी

Pandharinath Kamble Biography In Marathi

कुमारी गंगुबाई नॉन मेट्रिक ह्या फेमस अश्या कॉमेडी शो मधील पात्र म्हणेजच आपला लाडका छू उर्फ पंढरीनाथ कांबळे अस म्हणायला काही हरकत नाही कारण ह्याच शो द्वारेच पंढरीनाथ कांबळे यांना त्यांचा नावाने कमी पण छू या नावाने रसिक प्रेक्षक जास्त ओळखतात आणि हल्लीच ते बिग बॉस सीजन मराठी सीजन ५ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. पॅडी दादाने मराठी इंडस्ट्री मध्ये स्वतःचा दीर्घकाळ असा ठसा उमटवला आहे. त्याचा हजरजबाबीपणा, उत्तम अभिनय, एखादे पात्र दिले कि त्यात आपला सर्वस्वी प्राण ओतणारा कलाकार म्हणून पॅडी दादाला पहिले जाते. याच पॅडी दादाचा आज आपण जीवनचरित्र (Pandharinath Kamble Biography In Marathi) बघणार आहोत.

Pandharinath Kamble Biography In Marathi | पंढरीनाथ कांबळे यांची बायोग्राफी

सुरवातीचे आयुष्य:-

पंढरीनाथ कांबळे यांचा जन्म ११ मे १९६९ रोजी मुंबई, महाराष्ट्रामध्ये झाला. सध्याच त्यांचे वय हे ५५ आहे. सुरवाती पासून त्यांना अभिनय, कॉमेडी, नकला करणे करणे या मध्ये रुची होती. सर्वप्रथम त्यांना महेश मांजरेकारांच्या प्राण जाये पर शान ना जाये या चित्रपटांत पहिले गेले आणि हा त्यांचा पहिला वहिला हिंदी चित्रपट होता.

पंढरीनाथ कांबळेवैयक्तिक माहिती
जन्म तारीख११ मे १९६९
जन्माचे ठिकाणमुंबई, महाराष्ट्र.
अभिनयाची सुरवात२००३ साला पासून
प्रोफेशनअभिनेता
रासवृषभ
उंची५ फूट ६ इंच
गाजलेले चित्रपट/मालीकाबाप का बाप, खबरदार, कॉमेडीची बुलेट ट्रेन
इंस्टाग्राम आयडी@paddykamble
इंस्टाग्राम वरच्या फौलोअर्स ची संख्या1.66 लाख

करिअर :-

२००३ साली सर्वप्रथम त्यांना महेश मांजरेकारांच्या “प्राण जाये पर शान ना जाये” या चित्रपटांत पहिले गेले आणि हा त्यांचा पहिला वहिला हिंदी चित्रपट होता पुढे २००४ साली आलेली “कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक” हि सिरीयल प्रचंड गाजली आणि पंढरीनाथ कांबळे यांना आपण छू या पात्रामध्ये पहिले गेले आणि हे प्रेषकांचं आवडीतच पात्र हे ठरला. पंढरीनाथ कांबळे यांचा पहिला मराठी चित्रपट होता “मुन्नाभाई एस.एस.सी.” (२००५) ज्या मध्ये त्यांनी मुन्ना नावाचं पात्र साकारल होतं. त्या नंतर मराठी चित्रपट “येड्यांची जत्रा”(२०१२) मध्ये हि त्यांना पाहिल गेल आणि या मध्ये त्यांनी नारायणराव हे पात्र केल होतं . तसेच “खबरदार”(२००५) आणि “मामाच्या राशीला भाचा”(२०११) या चित्रपटांमध्ये हि त्यांना पाहण्यात आलं. मराठी सीरिअल्स जसे कि “हसा चकट फु”, ” कॉमेडीची बुलेट ट्रेन”, आणि ” महाराष्ट्राची हास्य जत्रा” यांमध्ये त्यांनी वेगवेगळे अशे कॉमेडी पात्र साकारले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. २०१३ मध्ये आलेलं “कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक” हे नाटक प्रचंड गाजलं नंतर पुढे कुर्रर्रर्रर्र या नाटकामधील अभिनयासाठी त्यांना म. टा. २०२३ कडून मध्ये अवॉर्ड हि भेटलं.

चित्रपट :-

  1. वऱ्हाडी वाजंत्री

वऱ्हाडी वाजंत्री हा एक कॉमेडी सिनेमा आहे. या चित्रपटात लग्न जुळवणाऱ्या व्यक्तीला ९९ जोडपे जुळवण्यात यश मिळते आणि एका जोडीने त्याचे शतक हे पूर्ण होणार असते अश्याच वेळी त्याला अश्या जोडप्याला लग्न जुळवण्याचे काम मिळते जे खूप कठीण असते आणि हा पूर्ण चित्रपट ह्याच विषयावच्या अवती भवती कॉमेडीरित्या फिरत असतो. विजय पाटकर हे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि वैभव परब यांनी लेखन केले आहे. पौर्णिमा अहिरे, मकरंद अनासपुरे, मोहन जोशी, सुनील गोडबोले, विजय कदम, पंढरीनाथ कांबळे, हेमांगी कवी, रीमा लागू, प्रभाकर मोरे, जयवंत वाडकर आणि बरेच अशे ताकदीचे कलाकार या चित्रपटात आहेत.

Pandharinath Kamble Biography In Marathi | पंढरीनाथ कांबळे यांची बायोग्राफी | वऱ्हाडी वाजंत्री

2. नो एंट्री पुढे धोका आहे

नो एंट्री पुढे धोका आहे हा कॉमेडी चित्रपट ७ सप्टेंबर २०१२ रोजी प्रदर्शित झाला. अंकुश चौधरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि प्रेम राजगोपालन, निखिल सैनी हे ह्या चित्रपटाचे निर्माते आहेत. अंकुश चौधरी, भरत जाधव, अनिकेत विश्वासराव, क्रांती रेडकर, मनवा नाईक, सई लोकूर, पंढरीनाथ कांबळे आणि सई ताह्मणकर हे या चित्रपटात कलाकार आहेत. २००२ साली आलेला तामिळ चित्रपट चार्ली चॅप्लिन याचा हा रिमेक आहे. नो एंट्री पुढे धोका आहे हा सिनेमा तीन माणसांच्या जीवनाबद्दलचा प्रवास दाखवतो.
कृष्णा हा एक विवाहित पुरुष आहे. सनी हा एक अविवाहित पुरुष आहे आणि प्रेम हा लग्न झालेलं असून अविविवाहित पुरुषासारखा वागत असतो. कृष्णाची बायको हि खूप शक्की स्वभावाची दाखवली आहे. प्लेबॉय सारखं वागणाऱ्या प्रेम ची बायको पूजा हि खूप प्रेमळ स्वभावाची आहे आणि सनी हा त्याच्या गर्ल फ्रेंड सोबत लवकरच लग्न करणार असतो. कृष्णा आणि सनी हे आपलं घिसापीटा आयुष्य त्यांचा मित्र प्रेम सोबत व्यक्त करतात आणि प्रेम त्यांना बॉबी ला भेटवतो तिच्या सोबत विवाहबाह्य ठेवण्यास सांगतो आणि याच संबंधामुळे कृष्णा आणि सनी याना खूप सारे प्रॉब्लेम्स ना सोमोरे जावे लागते आणि हेचं सगळं आपल्याला कॉमेडी आणि ड्रॅमा च्या रूपात या चित्रपटात पाहायला मिळते. ह्याआधी हा चित्रपट हिंदी मध्ये हि सारख्याच नावानेच आपण पहिला आहे.

नो एंट्री पुढे धोका आहे

3. येड्यांची जत्रा

येड्यांची जत्रा हा मराठी चित्रपट मिलिंद कवडे यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ३ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटाची कथा हि हऱ्या या पात्रांभोवती फिरत असते. ज्याला त्याचे गाव सोडायचे असते परंतु त्याच्या आजोबांच्या मृत्यूशयेवर तो गावातच राहून वडिलोपार्जित जमीन सांभाळण्याची शपथ घेतो. याच गावातल्या भांगडे पाटील यांचं हऱ्याच्या जमिनीवर डोळा असून ती जप्त करण्याच्या डाव असतो. हऱ्या हाच डाव उधळून लावण्यासाठी कशी शक्कल लढवतो या चित्रपटात आपल्याला पाहायला भेटत. पंढरीनाथ कांबळे यांनी या चित्रपटात नयनरावांची भूमिका केली आहे.

येड्यांची जत्रा

4. खबरदार

खबरदार ह्या मराठी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन हे महेश कोठारे यांनी केले आहे. या चित्रपटात भारत जाधव, संजय नार्वेकर, निर्मिती सावंत, किशोरी गोडबोले, मधुरा वेलणकर, विनय आपटे, रसिका जोशी, विजय चव्हाण, सुनील तावडे, रेशम टिपणीस, महेश कोठारे, मकरंद अनासपुरे अश्या कलाकारांची फौज आहे. खबरदार हा चित्रपट हा केरी ग्रांट आणि रॉसलिन्द रसेल यांच्या १९४० साली प्रदर्शित झालेल्या “हिस गर्ल फ्रायडे” या अमेरिकन चित्रपटापासून प्रभावित आहे. भरत जाधव यांनी भरत भालेराव म्हणून या चित्रपटामध्ये क्राईम रिपोर्टरचे पात्र निभावलं आहे. निर्मिती`सावंत यांनी गौरी श्रींगारपुरे म्हणून खबरदार वृत्तवाहिनीच्या मालकीणीची भूमिका केली आहे.
गौरी या भरत भालेराव यांना जेल मधून फरार झालेला गुन्हेगार अण्णा चिंबोरी याच्या बद्दल माहिती गोळा करण्याकरीता नेमतात. संजय नार्वेकर यांनी मारुती कांबळे हे पात्र केले आहे जे ट्रक मालक-चालक म्हणून दाखवले आहेत. अण्णा चिंबोरीचा खून होताना मारुती कांबळे यांनी पाहिलेले असते आणि तेच ह्या खुनाचे खरे साक्षीदार देखील असतात. परंतु त्यांना खरे गुन्हेगार याच खुनाचा आरोपी बनवून फरार म्हणून घोषित करतात. मारुती कांबळेला फक्त भरत भालेरावच न्याय मिळवून देतील या आशेने त्यांना सत्य सांगण्यासाठी भेटण्याचे प्रयत्न करत असतात आणि त्यांचा हा प्रवास ह्या चित्रपटात दाखवला आहे. पंढरीनाथ कांबळे ह्यांनी गौरी श्रींगारपुरे यांचा सहाय्यक म्हणून या चित्रपटात भूमिका केली आहे.

खबरदार

5. मुन्ना भाई एस. एस. सी.

“मुन्ना भाई एस. एस. सी.” हा मराठी चित्रपट सुनील नाईक यांनी दिग्दर्शित केला असून २००५ साली प्रदर्शित झाला. हा चित्रपट कॉमेडी असून त्या मधील मुन्ना हे पात्र पंढरीनाथ कांबळे यांनी केले आहे. मुन्ना हा खूप खोडकर मुलगा असतो आणि मुन्नाच्या याच खोडकर पणाला त्याचे पालक व शाळेतले कर्मचारी कंटाळले असतात. तो दयाळू आणि मनाने चांगला असतो परंतु त्याच्या खोडकर वृत्तीमुळे त्याचे चांगले गुण दुर्लक्षित होतात. एके दिवशी शाळेतल्या कॅन्टीन मध्ये काम करण्याऱ्या मुलाची आई हि आजारी आहे आणि त्याला दवाखान्यात पाठवण्यासाठी पैश्यांची खूप गरज आहे हे मुन्ना ऐकतो आणि मुन्नाला त्याचा वडिलांनी वीज बिल भरण्याकरिता पैसे दिलेले असतात आणि हेच पैसे तो कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या मुलाला देतो.
या मदती नंतर मुन्नाच्या च्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळते. त्याचे वडील पैश्यांचा गैरवापर केला व खोटे बोलण्याच्या आरोपाखाली मुन्नाला घरातुन हाकलून देतात. केलेले कृत्य हे खरे आहे व आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठी मुन्नाला भाग पडले जाते. या चित्रपटात विजय चव्हाण, गिरीष ओक, रमेश भाटकर आणि इतर कलाकार आहेत.

मुन्ना भाई एस. एस. सी

मालिका :-

  1. ग्रहण

“ग्रहण” हि एक मराठी भयपट मालिका होती जी “गाव गाता गजाली ” च्या समाप्तीनंतर झी मराठी वर प्रदर्शित झाली आणि पल्लवी जोशी यांनी याची सुरवात केली होती. हि मालिका रमा बद्दल आहे जी मध्यम वर्गीय गृहिणी आहे. ती तिचा नवरा अभय आणि आपली दोन मुले आर्या आणि नकुल यांच्या सोबत राहत असते.एकदा रमा आपल्या कुटुंबासाठी ग्रहणाच्या दिवशी आईसक्रीम आणण्यासाठी जाते आणि तेथे ती बसची धडक लागण्यापासून स्वतःचा बचाव करते. रमा जेव्हा आपल्या घरी जाते तेव्हा तिला कळते कि तिचे राहते घर हे तोडले गेले आहे त्या ठिकाणी नवीन घर हे बांधले आहे. ती आपल्या पती व मुलांच्या शोधांत रस्त्यावर भटकत असते.

पुढे निरंजन जो त्याच इमारतीत राहत असतो जिथे पहिले रमाच घर होते व तो रमाची अशी अवस्था पाहून तिची विचारपूस करतो तेव्हा रमा त्याला तिच्या कुटुंबाबद्दल आणि शेजारी श्री वाघ यांच्या बद्दल सांगते. पुढे निरंजन तिला सांगतो कि तो येथे गेल्या ३७ वर्षांपासून राहत आहे आणि तो बहुतेक लोकांना ओळखतो आणि त्याच्या नुसार असे व्यक्ती तेथे अस्तित्वात नसतात. निरंजन रमाला त्याच्या आईच्या इच्छेविरुद्ध आपल्या घर घेऊन जातो, त्यांना असा विश्वास असतो कि रमा एकतर वेडी आहे किंवा ग्रहण काळात फिरणारा आत्मा आहे.

2. कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक

कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक हि मालिका साल २००४ ते २००६ या कालावधीत खूपच गाजली होती. अन्यायाविरुद्ध लढा देणारी गंगुबाई ची भूमिका हि निर्मिती सावंत यांनी साकारली होती तर छू हे पात्र पंढरीनाथ कांबळे यांनी साकारलं होतं. पुढे या मालिकेवर आधारित चित्रपट तसेच नाटक देखील आले. दोनी हि पात्रांनी रसिकांच्या मनावर अनेक वर्ष राज्य केले आहे.

Big Boss Marathi Season 5

पंढरीनाथ कांबळे यांनी बिग बॉस सीजन ५ मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. उत्तम अभिनेता म्हणून तर ते प्रसिद्ध आहेतच आणि उत्तम व्यक्ती देखील आहेत. पहिल्याच हफ्त्यामध्ये रितेश देशमुख यांनी पॅडी दादाची चांगलीच कानउघाडणी केली आणि पॅडी दादांकडून कडून महाराष्ट्राला खूप चांगल्या खेळाची अपेक्षा आहे असे हि समजावून सांगीतले होते. कानउघाडणी नंतर पॅडी दादांचं या शो मध्ये योगदान वाढतच गेल आणि त्यांनी अनेक टास्कमध्ये उत्तम अस प्रदर्शन दिले. त्यांना फायनल पर्यंत मजल नाही मारता आली परंतु त्यांचा मनमोकळेपणा असो, इतरांना समजून घेण्याची मानसिकता असो, सुरजचे पालकत्व घेण्यापर्यंतचा दिलदारपणा असो असे त्यांच्या स्वभावाचे सर्व पैलू आपण बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये पहिले आणि हेच त्यांना इतरांपासून वेगळे ठरणार होतं.

Big Boss Marathi Season 5 मधील स्पर्धक

Nikki TamboliVaibhav ChavanVarsha UsgaonkarSuraj Chavan

निष्कर्ष :-

Pandharinath Kamble Biography In Marathi वरील ब्लॉग मध्ये आपण पंढरीनाथ कांबळे यांच्या जीवनचरित्राबद्दल दिलेली माहिती दिली तर हि माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमची प्रतिक्रिया आम्हाला खाली दिलेल्या इमेल आयडी वर फीडबॅक देऊन कळवू शकता.

E-Mail Id- Marathitube24@gmail.com

आमच्या बद्दल जाणून घ्या

Www.Marathitube.com