Abhijeet Sawant Biography In Marathi
अभिजीत सावंत हे नाव ऐकल्यावर आपल्या सर्वांना एकच आठवतं ते म्हणजे इंडियन आयडॉल सीजन 1 हा शो जो सोनी टीव्ही वर लागायचा आणि अभिजीत या शोचा अंतिम विजेता देखील ठरला होता. अभिजीतच्या आयुष्याला खरे वळण हे ह्याच शो द्वारेच मिळाले. गायनाची आवड ते इंडियन आयडॉल विजेता होण्यापर्यंतचा अभिजीतचा हा जीवनप्रवास Abhijeet Sawant Biography In Marathi या ब्लॉगद्वारे आपण आज पाहणार आहोत.
सुरवातीचे आयुष्य:-
अभिजीत सावंतचा जन्म ७ ऑक्टोबर १९८१ साली मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. अभिजीत लहानाचा मोठा हा मुंबईतच झाला. अभिजीत हा त्याच्या आजीच्या घरी एकत्रित कुटुंबामध्येच वाढला जेथे अभिजीतचे आई वडील तसेच इतर ६-८ लोकं एकाच खोलीचे राहत असत. अभिजीत चे वडील हे शिक्षक होते व आई हि गृहिणी आहे. अभिजीत शालेय शिक्षणात साधारण असा विद्यार्थीं होता. त्यामुळेच त्याला परीक्षा असली खूप भीती वाटायची.
एकदा त्याच्या शाळेत गायनाच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं तेव्हा अभिजीत हा इय्यता ६ वी मध्ये होता त्याने हि या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे ठरवले आणि त्याच्या गायनाचे कौतुक पूर्ण शाळेत झाले आणि शिक्षकांनी देखील पाठीवर शाबाशकीची थाप दिली. अभिजीतला हा प्रसंग अगदी मोहून टाकणारा वाटला आणि आपण हि क्षेत्रात जावं अशी आशा तो बाळगू लागला.
अभिजीत ने जेव्हा आपले १० वीचे शिक्षण पुरे केले तेव्हा त्याच्या काकांनी एका कॅसेटच्या शॉपमध्ये त्याला नोकरीला लावले, जिथे त्याला दरमहा ६०० रुपये भेटत असत.त्याचे काका ऑर्केष्ट्रा मध्ये गायन करत असत आणि त्यांनी अनेक असे शो त्या काळात केले होते आणि अभिजीतही त्यांना या शोमध्ये गायनाची साथ देत होता.
हळूहळू त्याची गायन क्षेत्रामध्ये रुची वाढू लागली आणि त्यानें ठरवले कि आपल्याला हि गायकच बनायचे आहे. सुरवातीला त्याच्या आई वडिलांना हा त्याचा निर्णय अमान्य होता. परंतु अभिजित आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि तो त्याच्या काकांच्या घरी राहू लागला. पुढे त्याने भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण त्याचे गुरु भावदीप जयपुरवाले यांच्याकडे घेतले.
करिअर
गायन क्षेत्रात उतरल्यानंतर अभिजीतला कार्यक्रम तर मिळत होते परंतु अभिजीतच्या करिअरला खरा उजाळा मिळाला तो इंडियन आयडॉल सीजन 1 या शोमुळेच. पॉप आयडॉल या ब्रिटिश कार्यक्रमाला प्रेरित होऊनच या शो ची निर्मिती केली गेली होती व सोनी टीव्ही वर हा शो 2004 साली प्रदर्शित झाला. हा शो भारतात प्रदर्शित होताच चाहत्यांना तो एवढा आवडू लागला कि टी. आर. पी. चे सर्व उच्चांक मोडून टाकले होते.
गायनाची आवड असणारे लोक तर हा शो पाहतच होते त्यासोबत इतर लोकं देखील पाहू लागले. अनु मलिक, फराह खान, सोनू मलिक हे या शोचे परीक्षक होते. भारताच्या प्रत्येक राज्यातून सर्वोत्कृष्ट असे १२ गायक निवडण्याचे आव्हाहन या तिन्हीही परीक्षकांवर होते. मुंबई शहरामध्ये जेव्हा ऑडिशन होते तेव्हा अभिजीत सावंतने त्याच्या सुरेल आवाजाने परीक्षकांचं मन जिंकलं व त्यांनी अंतिम १२ मध्ये अभिजीत हि असेल असे घोषित केलं.
या स्पर्धेत अभिजीत हा उत्त्तम असा प्रदर्शन देत होता आणि यामुळेच मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरात त्याचा चांगलाच असा चाहता वर्ग वाढला होता आणि चाहत्यांचं हेच प्रेम अभिजीतला अंतिम ४ स्पर्धकांपर्यंत घेऊन आलं. जेथे त्याच्या सोबत अमित साना, राहुल वैद्य, प्राजक्ता शुक्रे असे सुमधुर गायक होते. अंतिम फेरीत राहुल वैद्य आणि प्राजक्ता शुक्रे यांना कमी मते मिळाल्यामुळे त्यांना अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
शेवटी अभिजीतची अंतिम लढत हि अमित सोबत झाली आणि हि लढत एकदम चुरशीची झाली होती. दोघांना हि चाहत्यांनी डोक्यावर घेतल परंतु शेवटी मताधिक्य अभिजीतला जास्त असल्याने मराठमोळा अभिजीत सावंत हा पहिला इंडियन आयडॉल बनण्याचा मानकरी ठरला. या स्पर्धेचा विजेता म्हणून अभिजीतला ५० लाख रुपये, सोनी मुसिक सोबत एक अल्बम आणि होंडा सिटी कार बक्षिस म्हणून मिळाली.
वैयत्तिक माहिती:-
नाव | अभिजीत सावंत |
टोपण नाव | अभिजीत |
जन्म दिनांक | 7 ऑक्टोबर 1981, बुधवार |
वय | 42 वर्षे |
जन्मठिकाण | मुंबई, महाराष्ट्र |
प्रोफेशन | गायक, गीतकार, संगीतकार, होस्ट, अभिनेता |
ओळखला जातो | इंडियन आयडॉल सीजन 1 चा पहिला विजेता |
उंची(अंदाजे) | 5 फूट 8 इंच |
केसांचा रंग | काळा |
डोळ्यांचं रंग | काळा |
शिक्षण | 12 वी |
शाळा व कॉलेज | 1)राजा शिवाजी विद्यालय, दादर, मुंबई, महाराष्ट्र 2)चेतना एच. एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई, महाराष्ट्र |
आई-वडील यांची नांवे | 1)श्रीधर पांडुरंग सावंत (शिक्षक) 2)मनीषा सावंत |
बहिणीचं नाव | सलोनी राऊत |
वैवाहिक स्तिथी | विवाहित |
लग्नाची तारीख | 4 डिसेंबर 2007 |
पत्नीचे नाव | शिल्पा (एडवणकर) सावंत |
मुलांची नावे | मुलगी-समीरा सावंत आणि आहाना सावंत |
सध्याचे राहत असलेलं शहर | मुंबई, महाराष्ट्र |
धर्म | बौद्ध |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
आवडते गायक | मोह्हम्मद रफी, सोनू निगम, किशोर कुमार, उदित नारायण |
आवडता अभिनेता | शाहरुख खान |
आवडती अभिनेत्री | राणी मुखर्जी |
आवडते कार्टून | टॉम अँड जेरी, पॉपाय दि सेलर मॅन |
आवडता क्रिकेटर | सचिन तेंडुलकर |
आवडते खाद्यपदार्थ | डाळ-भात |
वाद:-
ड्रंक अँड हिट प्रकरणात आले होते नाव
सुरेल अभिजीत सावंतच नाव एकदा ड्रंक अँड हिट प्रकरणात आलं होतं. एका रात्री अभिजीत, इंडियन आयडॉल मधील सहस्पर्धक प्राजक्ता शुक्रे तसेच इतर काही जण पार्टी करून मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होते. अभिजीत हा त्याची ऑडी कार चालवत होता तर प्राजक्ता हि तिची होंडा सिटी कार चालवत होती. घरी परतत असतांना त्यांना रस्ता खाली भेटला व हे पाहून त्यांनी कार रेसिंग करण्याचे ठरवले. दोघांनी हि गाडी भरदाव वेगाने चालवायला सुरुवात केली.
त्या दोघांचाही गाड्यांची गती हि अंदाजे ताशी 110 किमो.पेक्षा जास्त होती आणि यातच प्राजक्ताचं तिच्या कारवरचं नियंत्रण सुटल व तिची कार एका दुचाकी स्वाराला जाऊन ठोकली. यात दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेली व्यक्तीला दुखापत झाली. हे पाहून आजूबाजूचे लोक जमा झाले हे सर्व पाहून अभिजीत तिच्या मदतीला धावत जात असतांनाच संतप्त जमावाने अभिजीत ला मारण्यास सुरुवात केली. काही वेळातच तेथे पोलीस आले व त्यांनी प्राजक्ता आणि अभिजीतला बेजबाबदारपणे गाडी चालवण्याच्या गुन्ह्या अंतर्गत अटक केले. नंतर त्या दोघांचीही जामिनावर सुटका करण्यात आली.
सोशल मीडिया बद्दल माहिती :-
इंस्टाग्राम | https://www.instagram.com/abhijeetsawant73/?hl=en |
यूट्यूब | https://www.youtube.com/channel/UCDluSwAIDwbpe62fVVX1HqA |
फेसबुक | https://www.facebook.com/AbhijeetSawantlive/ |
इंस्टाग्राम वरच्या फौलोअर्स ची संख्या | 5.41 लाख |
शो, अल्बम आणि सिनेमांची यादी:-
वर्ष | शोचं नाव | चॅनेल |
2024 | बिग बॉस मराठी सीजन 5 – उपविजेता | कलर्स टी.व्ही . मराठी |
2004 | इंडियन आयडॉल सीजन 1 – गायक (स्पर्धक तसेच अंतिम विजेता) | सोनी टीव्ही |
2005 | सी. आय. डी. – पाहूणा कलाकार | सोनी टीव्ही |
2006 | कैसा ये प्यार हैं – पाहूणा कलाकार | सोनी टीव्ही |
2008 | जो जीता वही सुपरस्टार – गायक (उपविजेता) | स्टार प्लस |
2008 | एशियन आयडॉल – गायक (दुसरा उपविजेता) | सोनी टीव्ही |
2008 | नच बालिये – डान्सर (स्पर्धक) | स्टार प्लस |
2010 | इंडियन आयडॉल सीजन 5 – सहयजमान | सोनी टीव्ही |
2011 | कॉमेडी सर्कस – हास्य कलाकार | सोनी टीव्ही |
2015 | कॉमेडी नाईट्स विथ कपिल – हास्य कलाकार | सोनी टीव्ही |
2018 | लव्ह मी इंडिया – गुरु | अँड टीव्ही |
वर्ष | संगीत अल्बमचे नाव | लेबल |
2005 | आपका अभिजीत सावंत | सोनी बी.एम.जि. मुसिक इंडिया |
2007 | जुनून | सोनी बी.एम.जि. मुसिक इंडिया |
2013 | फरीदा | युनिवर्सल मुसिक इंडिया |
2018 | दिल फकिरा | युनिवर्सल मुसिक इंडिया |
वर्ष | गाण्याचे नाव | चित्रपटाचे नाव | भाषा |
2005 | मर जावा मीट जावा (पार्श्वगायक) | आशिक बनाया आपने | हिंदी |
2006 | याद तेरी याद (पार्श्वगायक) | जवानी दिवाणी – अ युथफूल जॉयराइड | हिंदी |
2006 | रेशमी पाऊल तुझे | हिरव कुंकू | मराठी |
2008 | खेळ हा वेडा दिवाना (पार्श्वगायक) | भोळा शंकर | मराठी |
2010 | हॅपी एंडिंग (पार्श्वगायक) | तीस मार खान | हिंदी |
2012 | बेचे सपने (पार्श्वगायक) | चिटगाँव | हिंदी |
2013 | सर सुखाची श्रावणी | मंगलाष्टके वन्स मोर | मराठी |
2014 | बिटिंग बिटिंग (पार्श्वगायक) | इश्क वाला लव्ह | मराठी |
2015 | ये ना (पार्श्वगायक) | बाजी | मराठी |
2016 | इश्क (पार्श्वगायक) | डिशुम | हिंदी |
वर्ष | चित्रपटाचे नाव | पात्राच नाव | भाषा |
2009 | लॉटरी | रोहित अवस्थी | हिंदी |
मुसिकल व इतर व्हिडीओ:-
Big Boss Season 5 मधील प्रवास:-
अभिजीत सावंत बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये स्पर्धक म्हणून होता. या शो मध्ये अभिजीत एक उत्तम खेळाडू म्हणून आपल्या सगळ्यांसमोर आला. टास्कची उत्तम समज, खेळाडूवृत्ती अभिजीत कडे आहेच हेच आपल्याला करन्सी टास्क पाहायला मिळालं. अभिजीतच्या पायाला दुखापत असून देखील त्याने या टास्क मध्ये प्रदर्शन करण्याचे ठरवले आणि या मुळेच एका सफ्ताहमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी अभिजीतच्या खेळाचे खूप कौतुक केले. अंतिम फेरीत जाऊन बिग बॉस सीजन ५ चा विजेता होण्याचे स्वप्न अभिजीत बाळगत होता आणि उत्तम खेळाडू आणि परखड मते असणारा अभिजीत हा अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या स्पर्धांकांमध्ये होता आणि शेवटी त्याला अंतिम फेरीत उपविजेता पदावरच समाधान मानावे लागले. या त्याच्या खेळाबद्दल लोकांनी भरभरून मते व प्रेम दिले.
निष्कर्ष:-
परिस्तिथी कशी हि असो किंवा संसाधने कितीही कमी असो स्वतःवर आत्मविश्वास असेल तर व्यक्ती स्वतःची स्वप्ने पुरे करू शकतो हे आपल्याला Abhijeet Sawant Biography In Marathi या ब्लॉगद्वारे कळते. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असल्यास आम्हाला खाली दिलेल्या इमेल आयडी वर रिप्लाय करून तुमचा फीडबॅक देऊ शकता.
E-Mail Id – Marathitube24@gmail.com