Nikki Tamboli Biography in Marathi | निक्की तांबोळी ची बायोग्राफी

Nikki Tamboli Biography in Marathi

नमस्कार मित्रांनो सगळ्यांना तर माहीतच आहे Big Boss Marathi Season 5 हा तुफान गाजला होता आणि दर्शकांचं मनोरंजन करण्यात हा सीजन यशश्वी झाला . याच सीजन मधल्या स्पर्धक निक्की तांबोळी यांची बायोग्राफी Nikki Tamboli Biography in Marathi या ब्लॉगद्वारे बघणार आहोत.

Nikki Tamboli Biography in Marathi | निक्की तांबोळी ची बायोग्राफी

सुरवातीचे आयुष्य:-


निक्की तांबोळीचा जन्म हा 21 ऑगस्ट 1996 रोजी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे झाला. तिला एक भाऊ देखील आहे जतीन तांबोळी. ज्याचे साल 2021 मध्ये Covid-19 मुळे निधन झाले.

करिअर:-

निकी तांबोळीने आपल्या कारकिर्दीची सुरवात हि मॉडेलिंग ने केली. तिने नंतर 2019 मध्ये तेलगू हॉरर कॉमेडी चित्रपट Chikati Gadilo Chithakotudu याद्वारे अभिनय क्षेत्रामध्ये प्रदार्पण केले. या चित्रपटामध्ये तिने पूजा हे पात्र साकारलेले आहे.
नंतर तिने तामिळ सिनेमा मध्ये देखील आपले पाऊल टाकले. Kanchana 3 या चित्रपट मध्ये तिने दिव्याची भूमिका बजावली आहे. तिझा तिसरा तेलगू चित्रपट होता Thipparaa Meesam या मध्ये तिने मौनिका हे पात्र साकारलेले आहे.

पुढे तिने टेलेव्हीसन क्षेत्रात हि प्रदीपर्ण केले. Big Boss Hindi 14 व्या सीजन मध्ये ती स्पर्धक होती व त्यात तिने टॉप 3 पर्यंतची मजल मारली होती आणि ह्याच शोच्या माध्यमातून निक्की हि चांगलीच प्रचलीत झाली व नावाजली हि गेली.

Big Boss 14 मधील नक्कीच प्रवास

निक्कीच नाव हे Big Boss Hindi 14 मध्ये जाहीर होण्यापासून ते सगळ्यात पहिली स्पर्धक म्हणून अंतिम फेरीत जाण्यापर्यंतचा प्रवास हा अत्यंत प्रभावी असा होता. निक्कीने तो सीजन गाजवला आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःच वेगळ असं स्थान निर्माण केलं. निक्की बिग बॉस सीजन 14 मधील सगळ्यात तरुण स्पर्धक होती.

निक्की सीजन 14 च्या अंतिम फेरीत कशी पोहोचली याची देखील एक गंमतीशीर गोष्ट आहे. त्या सीजन मध्ये एक टास्क झालं होतं. त्यात त्या सीजनची (नंतर झालेली विजेता) म्हणजेच रुबिका दिलाईक विजेता ठरली. त्या टास्कच बक्षीस होत अंतिम फेरीत जाण्याची पहिली संधी. परंतु रुबिका हे बक्षीस स्वतःसाठी वापरू शकणार नव्हती कारण रुबिकाने राखी सावंतला रागाच्या भरात पाण्याची बाटली फेकून मारली याची शिक्षा म्हणूनच बिग बॉस ने तिला शेवट पर्यंत नॉमिनेट म्हणून जाहीर केले होतं. रुबिकाने हेच बक्षीस निक्कीच्या नावे केलं व अश्या प्रकारे निक्कीने अंतिम फेरीत मध्ये प्रवेश केला.

निक्कीने हा सीजन खूप हुशारीने खेळा होता त्याचे फळच तिला अंतिम फेरीत घेऊन आले. तुम्ही जर तो सीजन पहिला असेल तर निक्की हि नेहमी सकाळी वाजणाऱ्या गाण्याच्या गजराला सगळ्यात पहिली उठणारी स्पर्धक होती आणि दिलखुलास असा डांस करायची. तिचा डांस हा सगळ्यांपेक्षा हटके असा असायचा.

सगळ्यांना तिचा जान कुमार सानू सोबत केलेला नवरात्री विशेष डान्स हा लक्षातच असेल या डान्सच्या टास्क मध्ये रुबिका दिलाईक आणि अभिनव शुक्ला हे दोघे त्यांच्या आमने सामने होते. निकी आणि जानच्या डान्स हा एक्दम उत्तम झाला होता आणि यामुळेच या डान्सच्या सामन्यात त्या दोघांना विजयी घोषित करण्यात आले.


निक्कीचा आवाज आणि तिचा डांस करण्याची अदा हा विषय घरातच नाही आणि तर बाहेरही नेहमी चर्चेत राहिला होता. निक्की जशी मराठी सीजन ५ मध्ये वयाने मोठ्या असणाऱ्यांशी उद्धट बोलली तशीच ती या सीजन मध्ये देखील उद्धट बोलायची आणि कोणीही याबाबत तिला समजावण्याचा प्रयत्न केला तर तिचं एकच वाक्य असायचं ते म्हणजे “मैं ऐसी हि हुं” आणि ह्या कारणानेच सलमान खानने अनेकदा वीकएंड च्या वारमध्ये तिची कानउघाडणी केली होती तसेच त्याने तिला बजावलं होते कि तिने तिच्या ह्या स्वभावाबाबतीत सुधारणा केली नाही तर बाहेरील जगतात तिला खूप वाईट परिणाम भोगावे लागतील.

जेव्हा पत्रकारांसोबत सवांदाची वेळ होती तेव्हा हि तिच्या तोंडून एकच वाक्य निघालं “मैं ऐसी हि हुं”
पूर्णतः पहायला गेले तर ती जे बोलते त्या वर ठाम असायची आणि आपला स्वभाव हि असाच आहे हे हि तिने स्वीकारले होते आणि याच कारणाने तिला घरातले स्पर्धक ” डबल ढोलकी” आणि “पेन्डूलम” अश्या नावाने चिडवायचे. गंमत अशी झाली कि एका शुक्रवारच्या एपिसोडमध्ये तिच्या चुगलीखोर स्वभावामुळे तिला पेन्डूलम अवॉर्ड देखील दिला गेला होता.

खोट्या अंतिम फेरीच्या टास्क दरम्यान निक्की बिग बॉस च्या घरातून बाहेर पडली पण नंतर तिने राखी सावंत सोबत पुन्हा घरात प्रवेश केला. घराबाहेर पडण्याआधी निक्कीच रुबिना आणि तिचा जोडीदार अभिनव सोबत नेहमी भांडण झालीत परंतु निक्कीच्या पुन्हा झालेल्या प्रवेशानंतर रुबिना आणि निक्की मध्ये एक चांगली घट्ट मैत्री निर्माण झाली. घरातल्या इतर स्पर्धकांना रुबिका आणि निक्कीची झालेली जवळीक काही पचत नव्हती.
जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा निक्कीला असा प्रश्न विचारला कि ती रुबिनाचा वापर हा स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहे परंतु तिने स्पष्ट केले कि ती रुबीनाला आपल्या बहिणीसमान मानते.

ह्या सिजनच्या सुरवातीला निक्कीची मैत्री निशांत सिंग मालकानी, राहुल वैद्य आणि जान कुमार सानू सोबत झाली. परंतु या तिघांपैकी जान कुमार सानू सोबत तिची जवळीक जास्त होती. जानला याच कारणामुळे घरातले निक्कीचा कठपुतळी म्हणून संबोधित होते.
जेव्हा बिग बॉसने अंतिम फेरीमध्ये च्या आधीच्या सफ्ताहात अश्या व्यक्तींना बोलवलं होता जे खेळत असलेल्या स्पर्धकांच्या जवळ आहेत व त्या स्पर्धकांना पुढच्या फेरीत नेण्यासाठी समर्थन देतील आणि यावेळी निक्कीच्या समर्थनासाठी जान कुमार सानू आला होता.
निक्कीने या सीजनमध्ये उत्तम खेळ केलाच होता त्यासोबतच खेळाडूवृत्ती हि दाखवली होती. मग तो “मेरे अंगणे मे” वाला टास्क असो कि “बोट टास्क” असो ज्यात तिने अभिनवला तगडी ठक्कर दिली होती. उत्कृष्ट असा खेळ ती या सीजन मध्ये खेळी होती व तिचा हा खेळ पाहून दर्शक हि खुश होते.


2021 मध्ये कलर्सचा स्टंट वर आधारित असलेला रियालिटी शो Fear Factor- Khatron ke Khiladi 11 ज्याचे चित्रीकरण हे साऊथ आफ्रिकेच्या केप टाउन या शहरात करण्यात आले होते आणि या शो मध्ये तिला १०व्या स्थानकावर समाधान मानावं लागलं होत. याव्यतिरिक्त तिने नामांकित अश्या T-SeriesSaregama, Desi Music Factory यांच्यासोबत मिळून मुसिकल व्हिडिओस मध्ये देखील काम केलेले आहे.

2022 मध्ये तिला कलर्सच्या आणखी एका रिऍलिटी शो मध्ये पाहण्यात आले होते ज्याच नाव होता The Khatra Khatra Show आणि हा शो भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया हे दोघे होस्ट करत होते.

टाइम्स ऑफ इंडिया च्या “Most Desirable Women on Television- वर्ष 2020” च्या लिस्ट मध्ये निक्कीच नाव हे 8 व्या स्थानकावर झळकलं होत.

बायो :-

प्रोफेशनमॉडेल,अभिनेत्री
उंची(अंदाजे)सेंटीमीटर 165 cm/मीटर्स – 1.65 m/ फूट इंच 5’5″
वजन(अंदाजे)किलोग्रॅम – 55 kg/ 121 lbs
फिगर32-28-32
डोळ्यांचा रंगकाळा
केसांचा रंगमध्यम तांबडा
जन्म तारीख21 ऑगस्ट 1996(बुधवार)
वय(आता पर्यंतचे)28 वर्षे
राससिंह
जन्मस्थानछत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
शिक्षण12 वी तसेच मुंबईस्थित असल्येल्या अभिनयाच्या इन्स्टिट्यूट मधून शिक्षण घेतले
वैवाहिक स्तिथीअविवाहित
अफेर/बॉयफ्रेंडडीजे रोहित गिडा(अफवा)
पालकांचे नाववडील- दिगंबर (एक्साईड इंडस्ट्री मध्ये कार्यरत)
आई-प्रमिला बोडके तांबोळी(गृहिणी)

आवडत्या गोष्टी :-

आवडता सिनेमाहॉउसफ़ुल 4
आवडता अभिनेताशाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार
आवडता अभिनेत्रीकाजोल,करीन कपूर, नायंथारा
आवडता रंगकला, सफेद आणि लाल
आवडता गायकअरिजीत सिंग, नेहा कक्कड
आवडते खाद्य पदार्थपाणीपुरी, पनीर मसाला, पोंगल, डोसा
आवडते छंदनृत्य, मॉडेलिंग, प्रवास करणे
आवडत ब्रँडकार्टीयर
आवडत पेयकॉफी
लिपस्टिक ब्रँडमॅक
गोड पदार्थडेसर्ट
Nikki Tamboli Biography in Marathi | निक्की तांबोळी ची बायोग्राफी

सिनेमांची यादी:-

वर्षसिनेमा/गाणंपात्राचं नाव
2019Chikati Gadilo Chithakotuduपूजा
2019Kanchana 3दिव्या
2019Thipparaa Meesamमौनिका
2023Jogira Sara Ra Raआयटम नंबर

रिऍलिटी शोची यादी:-

वर्षशोचं नावपात्राचं नावक्रमांक
2020-2021Bigg Boss 14स्पर्धकतृतीय
2021Fear Factor: Khatron Ke Khiladi 11स्पर्धक१०व स्थान
2024Bigg Boss Marathi 5स्पर्धकतृतीय

मुसिक व्हिडिओस ची यादी:-

वर्षगाण्याचं नावगायक
2021Birthday PawriAmit Mishra and Aditi Singh Sharma
2021Kalla Reh JayengaJass Zaildar
2021Number LikhTony Kakkar
2021ShantiMillind Gaba
2021Roko RokoMellow D
2021Dil Kisi SeArjun Kanungo
2022Behri DuniyaAfsana Khan and Saajz
2022Ek Haseena NeRamji Gulati
2022ChhoriSonu Kakkar

संपत्तीची माहिती :-

बिग बॉसएका सप्ताहाचे अंदाजे 3.71 लाख रुपये
सिनेमाअंदाजे १० लाख ते ५० लाख
एकूण संपत्तीअंदाजे १ करोड त २ करोड
इंस्टाग्राम वरच्या फौलोअर्स ची संख्या55.8 Lakh

वाद :-

2022 साली निक्कीच नाव 200 करोड रुपयांच्या खंडणीच्या आरोपाखाली अटक झालेल्या सुकेश चन्द्रशेखर सोबत जोडले गेले होते. सुत्रांच्या माहितीनुसार सुकेश ची सहाय्यक पिंकी इराणीच्या मध्यस्तीने निक्कीला 1.5 लाख रुपये व पहिल्या भेटींनंतर सुकेश ने तिला 2 लाख किंमत असलेली गुची या ब्रँड ची बॅग भेटवस्तू म्हणून दिली. बडे अच्छे है मधून प्रसिद्धी मिळालेल्या चाहत खन्ना, सोफिया सिंग आणि आरुषा पाटील यांचं देखील या प्रकरणात नाव आलं होतं. तपासकरणाऱ्या एजेंसीकडून मिळालेल्या माहिती नुसार या चारही कलाकार सुकेश ला जेलच्या आवारात भेटल्या आणि त्याने यांना आपण दक्षिण भारतातला एक निर्माता असल्याचे सांगितले.

Big Boss Marathi Season 5

निकी तांबोळीला बिग बॉस मराठी सीजन 5 मधील स्ट्रॉंग खेळाडू म्हणून सगळेच स्पर्धक आणि प्रेक्षकांनी पहिले आहे. होस्ट रितेश देशमुख यांनी जसे कि म्हटलेच होते कि या शो ने या आधीच्या सर्व सिजन्सचे टि. आर. पी. चे सर्व रेकॉर्डस् हे तोडले आहेत. निक्कीने आल्या आल्याचं चांगलीच धुमाकुळ घातली मग ते ग्रुप बनवणं असो वा वर्षा ताईंसोबतची भांडण असो, तिच परखड मत आणि भांडखोर स्वभाव आणि या शो ला साजेसा असा खेळ खेळल्यामुळे निक्कीने आपला वेगळा चाहतावर्ग तयार केला आणि यामुळेच ती टॉप य मध्ये आली आणि शेवटी तिला तृतीय क्रमाकांवर समाधान मानावं लागलं.

Big Boss Season 5 मधील इतर स्पर्धकांबद्दल जाणून घ्या

Pandharinath KambleVaibhav ChavanSuraj ChavanVarsha Usgaonkar

निष्कर्ष :-


Nikki Tamboli Biography in Marathi या ब्लॉग मध्ये आपण निक्की तांबोळीच्या जीवनचरित्राबद्दल जाणून घेतलं. दिलेली माहिती हि तुम्हांस आवडली असेल तर आम्हाला खाली दिलेल्या इ मेल आयडी वर मेल द्वारे तुमचा फीडबॅक देऊ शकता.

E-Mail Id- Marathitube24@gmail.com

आमच्या बद्दल जाणून घ्या

Www.Marathitube.com